
पारनेर : नुकत्याच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत अहमदनगर जिल्हा क्रीडा समिती आयोजित, आंतरमहाविद्यालयीन बॉक्सिंग स्पर्धा न्यू आर्टस्,कॉमर्स अँड सायन्स कॉलेज,पारनेर या ठिकाणी संपन्न झाल्या. सदर स्पर्धेसाठी जिल्ह्यातील १८ महाविद्यालयातील मुले आणि ७ महाविद्यालयातील मुलींनी सहभाग नोंदवला होता.
सदर कार्यक्रमाच्या प्रसंगी जिल्हा क्रीडा समितीचे सचिव डॉ.राहुल भोसले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर, उपप्राचार्य डॉ.दिलीप ठुबे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ.दत्तात्रय घुंगार्डे आदी मान्यवर उपस्थित होते.
उदघाटनप्रसंगी प्राचार्य डॉ.आहेर सर म्हणाले की, उत्तम समाजनिर्मितीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण आरोग्याची काळजी घेतली पाहिजे.पुढे बोलताना ते म्हणाले की, कोरोना महामारीशी मुकाबला करण्यासाठी रोगप्रतिकार शक्ती वाढवणे गरजेचे आहे त्यासाठी आपण नित्यनेमाने व्यायाम केला पाहिजे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडा विभागप्रमुख डॉ.संजय गायकवाड यांनी केले तर आभार प्रा.गंगाराम खोडदे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी क्रीडा प्रशिक्षक बाबाजी साळुंखे यांनी सहकार्य केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अतुल झंजाड यांनी केले.
from https://ift.tt/328fgoG