गेल्या काही दिवसांपासून ऐन हिवाळ्यात अवकाळी पाऊस सुरू झाला आहे. तसेच पुढचे काही दिवस राज्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र अवकाळी पाऊस म्हणजे काय? त्याची कारणं काय? याविषयी अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्याबाबत अधिक सविस्तर जाणून घेऊयात…
अवकाळी पाऊस म्हणजे काय? : भारतात प्रामुख्याने नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे पाऊस पडत असतो. हे वारे भारताच्या दक्षिण भागातून भारतात प्रवेश करतात आणि टप्प्याटप्प्याने उत्तरेकडे सरकतात. तसेच अवकाळी पावसाचा कमी दाबाचा पट्टा महाराष्ट्रात कुठेही तयार होऊ शकतो.
अवकाळी पावसाची कारणं :
● जसे जागतिक वातावरणात बदल होतात तसे स्थानिक वातावरणामध्येही बदल होत असतात.
● जगभरातील विविध देशात पडणारा पाऊस हा तेथील स्थानिक भौगोलिक परिस्थितीवर अवलंबून असतो.

● भारतातला मान्सून दोन भागांमधून येतो. एक बंगालच्या उपसागरातून तर दुसरा अरबी समुद्रातून. हे दोन्ही वारे संपूर्ण भारतात पसरतात.
● अवकाळी पाऊस हिंदी महासागर आणि बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे होतो. याची तीव्रता भौगोलिक परिस्थितीनुसार कमी -जास्त होत असते.

from https://ift.tt/3IaBHd7

By News

Leave a Reply

Your email address will not be published.