
पारनेर :एस.टी. कामगारांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभा असून सत्ताधारी पक्षाचा आमदार म्हणून पहिल्या दिवसापासून मी तुमची बाजू सरकारदरबारी मांडलेली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहन मंत्री अनिल परब यांच्यापर्यंत तुमच्या मागण्या मी पोहचविल्या आहेत. महाविकास आघाडी सरकार तुम्हाला निश्चित न्याय देईल, जरा धीर धरा असे सांगत आ. निलेश लंके यांनी आमदारकीपेक्षाही गोरगरीबांच्या सुखातच मला जास्त आनंद असल्याची भावना येथे बोलताना व्यक्त केल्या.
आमदार लंके यांनी पारनेर आगारात आंदोलन करीत असलेल्या कर्मचाऱ्यांची काल भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. कर्मचाऱ्यांनी त्यांची बाजू मांडल्यानंतर आ.लंके यांनी संवाद साधला. ते म्हणाले, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रश्नात लक्ष घातले आहे. शुक्रवारी सकाळी मुंबईत पवार साहेबांची भेट घेऊन आपण एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसदर्भात चर्चा केली आहे. पवार साहेबांनी या प्रश्नात लक्ष घातलेले आहे. त्यामुळे तुम्हाला निश्चित न्याय मिळेल.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार शनिवारी नगर जिल्हयाच्या दौऱ्यावर होते. त्यांनी त्यांच्या भाषणात एस.टी. कामगारांच्या प्रश्नाची दखल घेतली आहे. तुमचे प्रश्न महाविकास आघाडी निश्चित मार्गी लावणार आहे. तुम्ही निश्चिंत रहा असा सल्ला आ. लंके यांनी यावेळी दिला.
यावेळी आबा भाेंंडवे, संभाजी ठुबे, दत्ता कोरडे, सोमनाथ शहाणे, बलभिम कुबडे, कल्पना नगरे, स्वरूपा वैद्य, शितल मोरे, सौ. चौरे, संगिता जाधव, सविता शिंदे, बापू शिंदे, संदीप शिंदे, राजू पठाण, संतोष ठुबे, सचिन थोरात, संजय पवार, गणेश चौधरी, चत्तर, मोरे, दिघे, नवले, रोकडे, गायकवाड, औटी, बंटी परदेशी, सुनिल परदेशी, मच्छिद्र शिंदे, खताळ, पोटे आदी कर्मचारी उपस्थित होते. आ. लंके यांच्या समवेत अॅड. राहूल झावरे, विजय औटी,संदेश कापसे संदीप चौधरी, बापू शिर्के,महेंद्र गायकवाड,सत्यम निमसे,विनायक शेळके,अविनाश येणारे,सुहास नगरे, सनी थोरात हे कार्यकर्ते उपस्थित होते.
लॉकडाउन शिथील करण्यात आल्यानंतर परराज्यातील कामगारांना त्यांच्या गावी पोहचविण्याची जबाबदारी आ. लंके यांनी घेतली होती. औदयोगिक वसाहतीमधील राज्याच्या सिमेवर एसटीच्या एका कर्मचाऱ्याने काही तरूणींना त्यांच्या इच्छित स्थळी न सोडता मधेच सोडून दिले. त्या तरूणींनी आ. लंके यांच्याशी संपर्क करून त्यांच्यावर गुजारलेल्या प्रसंगाची माहीती दिली त्यावेळी ती बस तेथून निघून गेली होती. एस.टी. कर्मचाऱ्यांशी चर्चा करताना आ. लंके यांना तो प्रसंग आठवला. सबंधित कर्मचाऱ्याला त्याची आठवण करून देताना आ. लंके यांच्या डोळयात अश्रू उभे राहिले. ज्या तरूणी होत्या, त्या माइया मतदार, नातेवाईक अथवा कोणीही नव्हत्या. गरीब घरातील तरूणी सातशे आठशे किलोमिटरवरून कामासाठी आपल्या भागात आल्या, त्यांना त्यांच्या घरी पोहचविण्याची मानवता म्हणून तुमची माझी जबाबदारी आहे. यापुढील काळात असे कोणालाही संकटात टाकू नका असा सल्लाही आ. लंके यांनी यावेळी दिला.
from Parner Darshan https://ift.tt/3Dk3zIQ