अन्नमय कोशावर विजय कसा मिळवावा?

Table of Contents

स्थुलदेह हा अन्नामुळेच पोसला जातो.त्यात वाढ होऊन बाल्यावस्था, कुमारावस्था,युवावस्था,प्रौढावस्था आणि शेवटचे चरण म्हणजे वृद्धावस्थेत होऊन मृत्यू होतो.कुणाला किती आयुष्य मिळेल हे गुलदस्त्यातच असल्यानेच जगण्याला प्राधान्य आहे. परंतु योग्य गतीने जगण्यासाठी बौद्धिक शक्ति वापरावी लागते.त्यावर विचार केला नाही तर जणावरांमधे आणि मनुष्यामधे फार फरक रहात नाही.तरीही प्राणी मनुष्यापेक्षा ज्ञानीच म्हणावे लागतील.कारण मनुष्यप्राण्याखेरीज सर्व प्राणी जगण्यासाठी खातात.बहुतांश माणसं खाण्यासाठी जगतात ते निर्विवाद सत्य आहे. यात अनेक मतमतांतरे आहेत.मनुष्य जन्म पुन्हा नाही. घ्या मजा करून अशी धालणा मोठी आहे. पण यासाठी मनुष्यजन्म मिळालाय का?
असा प्रश्न ज्याला पडेल त्यासाठी हा लिखाणप्रपंच आहे.शरीर भोग भोगावेच लागणार आहेत.पण चुकीच्या जीवनशैलीने ते अधिक भयंकर होतात याचं ज्ञान होणं भाग्याचं.शरिराचं पोषण जर अन्नाद्वारेच होणार आहे मग खाण्यात कसलं आलय शास्र?असा प्रश्न पडेलही.पण हा प्रश्नच तुम्हाला उत्तरापर्यंत घेऊन जाईल.कोणतेही इंजिन चालण्यासाठी त्यात ऑईल असावे लागते शिवाय गतीज ऊर्जा निर्माण होण्यासाठी डिझल,पेट्रोल असावेच लागते.पण या सर्वांचं प्रमाण ठरलेलं असतं.त्यासाठी ऑईललेव्हल मीटर,गेजपट्टी दिलेलीअसते.कार्बोरेटर,फ्युएलपंप यातुन नियंत्रित इंधन सोडले जाते.मोठ्या ताकदीची इंजिनं तप्त होऊ नयेत म्हणून रेडिएटरद्वारे पाण्याचीही व्यवस्था केलेली असते. या सगळ्यांना एकत्रित बांधुन इंजिन योग्य रितीने धडधडत असते.
शरीरशास्त्र असच आहे.
सर्व गोष्टी नियंत्रित राहिल्या तरच ते काहीतरी खास करिल.जन्माला आल्याचं सार्थक होईल.
म्हणुनच अन्नमय कोशावर विजय मिळवायचा आहे.
सतत काहीतरी खावसं वाटणं,विषेश पदार्थांची रुची तिकडे ओढ घ्यायला लावते.अमुकच पदार्थ खायला हवा ही खाण्यासाठी जगण्याची तऱ्हा आहे.खाण्याच्या मोहातुन बाहेर पडणे म्हणजे अन्नमय कोशावर विजय मिळवण्यासाठी केलेला पहिला प्रयत्न आहे. आवडीच्या पदार्थांचा मोह कमी करण्याचा प्रयत्न म्हणजे प्रत्याहाराचं पालन करणे आहे.(उत्तरार्ध उद्याच्या भागात) रामकृष्णहरी

from https://ift.tt/VDrLSqQ

Leave a Comment

error: Content is protected !!