जर तुम्हाला अँड्रॉईड फोनवर नको असलेले आणि अनोळखी नंबर ब्लॉक करायचे असतील तर हा लेख खास तुमच्यासाठीच आहे. गुगल यासाठी एक बाय डिफॉल्ट सेवा देते. अँड्रॉईड जगात अनेक फोन निर्माते असल्याने ही पद्धत वेगवेगळ्या कंपनीच्या उपकरणांवर वेगवेगळी असू शकते. चला, तर त्याबाबत अधिक सविस्तर जाणून घेऊयात…  
अँड्रॉइड फोन वापरकर्त्यांसाठी :
▪ गुगल फोन अ‍ॅप डाउनलोड करा.
▪ डायलर सर्च बारच्या वर उजव्या बाजूला असलेल्या तीन डॉटवर क्लिक करा.
▪ आता सेटिंग्सवर क्लिक करून ब्लॉक नंबरवर जा.
▪ Unknown पर्याय सुरु करा.
टीप : लक्षात ठेवा, अँड्रॉइडमध्ये Unknown म्हणजे तुमच्या फोनमध्ये सेव्ह केलेले फोन नंबर नाहीत, तर जे तुमच्या कॉलर आयडीमध्ये खाजगी किंवा अज्ञात म्हणून फ्लॅश करतात ते.
सॅमसंग अँड्रॉइड फोन वापरकर्त्यांसाठी :
▪ गुगल फोन अ‍ॅप उघडून डायलर सर्च बारच्या वर उजव्या बाजूला असलेल्या तीन डॉटवर क्लिक करा.
▪ सेटिंग्सवर क्लिक करून ब्लॉक नंबरवर जा.
▪ Block unknown/ hidden numbers वर क्लिक करून प्रायव्हेट आणि अनोळखी नंबर ब्लॉक करा.
शाओमी अँड्रॉइड फोन वापरकर्त्यांसाठी :
▪ गुगल फोन अ‍ॅप उघडून डायलर सर्च बारच्या वर उजव्या बाजूला असलेल्या तीन डॉटवर क्लिक करा.

▪ सेटिंग्समध्ये जाऊन Unknownवर क्लिक करा.
(वर दिलेली पद्धत MIUI 12.5वर आधारित स्मार्टफोनसाठी आहे. जर तुमच्या शाओमी फोनची आवृत्ती वेगळी असेल तर यामध्ये बदल असण्याची शक्यता आहे.)
वरीलप्रमाणे अनोळखी नंबर ब्लॉक करण्याच्या निश्चित मार्गाव्यतिरिक्त, ट्रूकॉलर सारखे काही थर्ड पार्टी अ‍ॅप आहेत जे Unknown नंबर ब्लॉक करण्यास मदत करतात.

from https://ift.tt/1iJyXTo

By News

Leave a Reply

Your email address will not be published.