
आपण देवाच्या नावानं चालणारे अनेक पंथ,धर्म, संप्रदाय पहातो,तसेच अनेक धार्मिक,वैदिक वाडःमयही उपलब्ध आहे.या सर्वांचा अभ्यास करायचा म्हटलं तर आयुष्य पुरणार नाही.
आपण एखादी वस्तू खरेदी करताना सर्व बाजार फिरतो आणि मगच ती योग्य ठिकाणी खरेदी करतो.देवाबाबत मात्र आमची गफलत होत आहे.
माऊली म्हणतात,
मंथुनी नवनीता तैसें घे अनंता । वायां व्यर्थ कथा सांडी मार्गु ॥२॥
जसं दही घुसळून लोणी मिळतं आणि त्यापासून उत्तम असं तुप मिळतं.तसं ईश्वरबोध घेण्यासाठी झटलं पाहिजे. इतर सगळी केलेली साधनं म्हणजे ताकावर भागवण्यासारखं आहे. तुप मिळालेच नाही तर तुप नसतेच असा समज होईल. म्हणून तुप मिळण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.
या जगतात दोन प्रकारचे लोक आहेत एक सर्व तपासून या जगताचे कारण ईश्वर आहे हे विवेकबुद्धीने मान्य करुन स्थिरावतात व त्यालग साजेसे जीवन जगतात.दुसरा जो वर्ग आहे तो आचरणाने,साधनाने,कर्माने त्याचा अनुभव घेतात.
माऊली म्हणतात हे ताकासमान आहे. मंथनातुन ईश्वर रुपी तुपचं मिळाले पाहिजे आणि ते मिळते असं दृढत्वाने माऊली सांगतात.हरिला सर्वत्र पहाता येते,कसे?ते पुढील भागात पाहु.
रामकृष्णहरी
from https://ift.tt/3z3Squr