
सतीश डोंगरे
पारनेर / शिरूर : पारनेर तालुक्यातील रांधे येथे 60 व वडगाव दर्या येथे 16 तर शिरूर तालुक्यातील पिंपरी दुमाला येथे 40 ते 45 मेंढ्या रात्री झालेल्या संततधार पावसाने आणि थंडीने गारठून मृत्यूमुखी पडल्या आहेत. तर या ठिकाणच्या अजूनही काही मेंढ्या अत्यवस्थ अवस्थेत असून त्यांना वाचविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
अचानक आलेले या संकटाने मेंढपाळांचे मोठे नुकसान झाले असून महसूल विभागाने पंचनामा करून आम्हाला नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
काल रात्री पासून पारनेर आणि शिरूर तालुक्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यातच थंडगार वारे वाहत असून त्यामुळे मेंढ्या पावसाने व थंडीने गारठून अत्यवस्थ झाल्या अन् त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
या मेंढपाळांच्या रात्री हा प्रकार लक्षात आल्यानंतर शेकोटी पेटवून या मेंढ्यांना ऊब देण्याचा प्रयत्न मेंढपाळांनी केला मात्र तो असफल ठरला. या सर्व मेंढ्यांचा पंचनामा करून त्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे. या सर्व मेंढ्या उघड्यावर असल्यामुळे पावसाने आणि दंड थंडीने त्यांना जोडले मात्र हतबल झालेले मेंढपाळ काहीच करू शकले नाहीत.
आज मृत्युमुखी पडलेल्या मेंढ्या पाहण्यासाठी गावातील ग्रामस्थांनी व कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी धाव घेतली या वेळी सर्वत्र मृत्युमुखी पडलेल्या मेंढ्यांचा खच पडला होता. अशाही अवस्थेत वरून संततधार पावसाची धार चालू होती. तर दुसरीकडे अंग गारठून टाकणारा गारवा अंगाला झोंबत होता. हे दृष्य पाहून अनेकांनी हळहळ व्यक्त केली.
माझ्या सर्व पदाधिकारी आणि सहकारी यांना नम्र विनंती करण्यात येते की,काल झालेल्या अवकाळी पाऊसाने अनेक धनगर बांधवांच्या मेंढ्या दगवलेल्या आहेत. तसेच अनेक ठिकाणी इतर ही नुकसान झाले आहे.
तरी आपण आपल्या विभागातील तलाठी,मंडलाधिकारी व पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याशी संपर्क करून आपल्या गावातील नुकसानीचे पंचनामे करून घेऊन मेंढपाळ बांधवाना सहकार्य करावे ही विनंती.
आमदार निलेश लंके
पारनेर तालुक्यातील पारनेर परिसर, अळकुटी, रांधे,किन्ही,वडगाव दर्या,ढवळपुरी भागात प्रचंड थंडीमुळे शेळ्या-मेंढ्या दगावल्या आहेत याबाबत पशुवैद्यकीय अधिकारी यासह प्रशासकीय अधिकाऱ्यांना पंचनामा करण्याच्या सुचना दिल्या आहेत व पंचनामे सुरू झाले आहेत.
सभापती गणेश शेळके
या गावात अतिवृष्टीचा तडाखा आणि पशुधनाचे नुकसान
रांधे ,पाडळी आळे,पळवे,पोखरी,वारणवाडी,पठारवाडी,कुरुंद,म्हसोबाझाप,खडकवाडी,वनकुटे,चोंभूत,शिरापूर,कातळवेढा, पारनेर (तिरकळ मळा),पुणेवाडी,पारनेर (पुणेवाडी फाटा),पारनेर(सोबलेवाडी),किन्ही,कान्हूरपठार,कळमकरवाडी(पाडळी रांजणगाव,निघोज, पिंपरी विळद (नगर),मावळेवाडी
from https://ift.tt/3pmaBa5