
पुणे : पवार कुटुंबीयांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी दरवर्षी प्रमाणे यंदाही बारामतीतील आप्पासाहेब पवार ऑडिटोरियममध्ये कार्यकर्ते मोठ्या संख्येने दाखल झाले होते. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा.शरद पवार, खा.सुप्रिया सुळे आणि आ.रोहित पवारांनी शुभेच्छा स्वीकारल्या. पण पवार कुटुंबीयांच्या दिवाळी कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवारांची अनुपस्थितीमुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते.
आता शरद पवारांनी या मागले कारण सांगितले आहे.
पाडवा कार्यक्रमानंतर खा.शरद पवारांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. अजित पवारांच्या घरातील 3 कर्मचारी आणि 2 दोन वाहनचालकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून कार्यक्रमाला येऊ नये असे आम्ही सुचवले असल्याचे शरद पवार यावेळी बोलताना म्हणाले.
यावेळी शरद पवारांच्या स्पष्टीकरणामुळे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अनुपस्थिवरून रंगलेल्या चर्चांना पूर्णविराम लागला आहे. पत्रकारांशी बोलताना शरद पवारांनी पेट्रोल डिझेलचे दर, तसेच सध्या राज्यात सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबरोबरच कोरोना विषयीही भाष्य केले.
from Parner Darshan https://ift.tt/3bL7T7K