शिरूर : तालुक्यातील ढोकसांगवी येथे दहा फूटी अजगर आढळल्याने या भागातील रहिवाशी व गावातील नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.रविवारी आढळलेल्या या अजगरास येथील सर्पमित्रांनी मोठ्या शिताफीने पकडून त्याला दूर जंगलात सोडून दिले.
ढोकसांगवी येथे राहणाऱ्या केतन बिडगर यांना त्यांच्या घराच्या बाजूला रात्रीच्या वेळी भला मोठा साप दिसल्याने त्यांची भीतीने गाळण उडाली. त्यांनी तातडीने आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना बोलावून घेतले त्यावेळी हा अजगर असल्याचे निदर्शनास आल्यानंतर या भागातील रहिवाशी व   नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
या अजगरास येथील सर्पमित्र शेरखान शेख, श्रीकांत भाडळे, अमोल कुसाळकर यांनी जेसीबीच्या आधाराने मोठ्या शिताफीने पकडले व वनखात्याशी संपर्क साधला त्यानंतर त्याला वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक संतोष भुतेकर यांच्या मदतीने अजगरास दूर जंगलात सोडून दिले.

यावेळी बाळासाहेब मोरे, प्रविण बामणे, अर्शलान शेख यांच्यासह केतन बिडगर, सौरभ मलगुंडे, सुदाम पाचंगे, विनय जाधव आदी स्थानिक तरूणांना मोठी मदत केली.
गेल्या वर्षी पहिल्यांदाच तालुक्यातील गोलेगाव येथे भला मोठा अजगर आढळला होता. तर दोनच महिन्यापूर्वी शिक्रापूर – चाकण रस्त्यावर सुमारे बारा फूट लांबीचा भला मोठा अजगर आढळला होता त्यानंतर पुन्हा एकदा ढोकसांगवी परिसरात अजगर आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
शिरूर तालुक्यात यापूर्वी कधीच अजगर आढळत नव्हते मात्र अलीकडच्या काळात कायम अजगर आढळू लागल्याने नागरीकांनी शंका व्यक्त केली असून सर्पमित्रांनी पकडलेले अजगर दूर जंगलात नेऊन सोडावे जेणेकरून ते पुन्हा मानवी वस्तीत येणार नाहीत याची काळजी घ्यावी, अशी मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे.

from Parner Darshan https://ift.tt/3Hq52jk

By News

Leave a Reply

Your email address will not be published.