‘हे’ 9 विदेशी क्रिकेटपटू आहेत भारतीय जावई!
या यादीत कोणकोणते खेळाडू आहेत ?
ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू ग्लेन मॅक्सवेल भारताचा जावई झाला आहे. तो विनी रमण सोबत विवाहबद्ध झालाय. मात्र या आधीही इतर अनेक क्रिकेटपटू भारताचे जावई बनले आहेत. या यादीत कोणकोणते खेळाडू आहेत? त्यावर एक नजर टाकूयात…
1. ग्लेन मॅक्सवेल : ग्लेन मॅक्सवेल आणि विनी रमण यांचा हा विवाहसोहळा मेलबर्नमध्ये पार पडला. दोघेही भारतात 27 मार्च रोजी तमीळ पद्धतीनेही विवाहबद्ध होणार आहेत.
2. शोएब मलिक : पाकिस्तानचा अष्टपैलू क्रिकेटपटू असलेला शोएब मलिक 2010 मध्ये भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झाशी विवाहबद्ध झाला. या लग्नानंतर दोघांना जोरदार ट्रोलिंगलाही सामोरं जावं लागलं होतं.
3. मुथ्थय्या मुरलीधरन : श्रीलंकेचा दिग्गज फिरकीपटू मुथ्थय्या मुरलीधरने 2005 मध्ये चेन्नईस्थित मधीमलार रमामूर्ती या तरूणीशी विवाह केला. मधीमलार ही चेन्नईच्या मलार हॉस्पिटलचे संचालक नित्या आणि एस. रमामूर्ती यांची कन्या आहे.
4. शॉन टेट : ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज शॉन टेट याने 2014 मध्ये मॉडेल माशूम सिंगाशी लग्नगाठ बांधली होती. त्यांचा विवाह निकटवर्तीय मित्रमंडळींच्या उपस्थितीत मुंबई येथे संपन्न झाला होता.
5. हसन अली : पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अली यानेही मूळ भारतीय असलेल्या समिया आरजूशी दुबई येथे 2019 मध्ये विवाह केला. सध्या दोघांना एक कन्यारत्नही झालं आहे.
6. झहीर अब्बास : पाकिस्तानचे दिग्गज क्रिकेटपटू झहीर अब्बास यांनी रिता लुथरा यांच्याशी 1988 मध्ये विवाह केला होता. ते आता कराचीमध्ये स्थायिक आहेत.
7. ग्लेन टर्नर : न्यूझीलंडचे दिग्गज खेळाडू ग्लेन टर्नर यांनी 1973 साली सुखिंदर कौर यांच्याशी लग्न केलं होतं. त्यानंतर सुखविंदर कौर या न्यूझीलंडमध्ये सुखी टर्नर नावाने प्रसिद्ध झाल्या. पुढे सुखी यांनी न्यूझीलंडच्या राजकीय क्षेत्रातही आपली ओळख निर्माण केली.
8. माईक ब्रेअर्ली : इंग्लंडचे दिग्गज क्रिकेटपटू माईक ब्रेअर्ली सुद्धा भारताचे जावई आहेत. 1970 मध्ये माईक यांनी माना साराभाई यांच्याशी विवाह केला होता. गुजरातमधील सुप्रसिद्ध उद्योजक गौतम साराभाई यांच्या त्या कन्या होत. सध्या ते लंडनमध्ये स्थायिक असून त्यांना दोन अपत्य आहेत.
9. मोहसीन खान : पाकिस्तानी क्रिकेटपटू मोहसीन खान यांनी भारतीय चित्रपट अभिनेत्री रिना रॉय यांच्याशी विवाह करून 90 च्या दशकात खळबळ माजवली होती.कराचीत दोघांचा विवाह समारंभ पार पडला होता. मात्र अल्पावधीतच दोघांचा घटस्फोट झाला.

from https://ift.tt/rh3KYnD

By News

Leave a Reply

Your email address will not be published.