📌आजचे 12 राशींचे राशिभविष्य🔸13 मार्च 2022
▪मेष : कामाची योग्य पावती मिळेल. अपेक्षित लाभाची अपेक्षा पूर्ण होईल. कामात सहकार्‍यांची मदत घेता येईल. कामे वेळेत पूर्ण करण्यावर भर द्याल.
▪वृषभ : घरगुती वापराच्या वस्तु खरेदी कराल. मनातील इच्छा पूर्ण करता येईल. कमिशनच्या कामातून लाभ होईल. अधिकारी व्यक्तींचा घरात वावर राहील.
▪मिथुन : मदतीचा हात सढळ ठेवाल. वैवाहिक सौख्याकडे लक्ष द्यावे. आपली कला इतरांसमोर सादर करता येईल. तुमच्यातील चांगल्या गुणांचे कौतुक केले जाईल.
▪कर्क : पत्नीशी मतभेद संभवतात. वैचारिक स्थिरता ठेवावी. मानसिक व्यग्रता जाणवेल. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल.
▪सिंह : मुलांचे धाडस वाढेल. आर्थिक प्रश्न मार्गी लागतील. जमिनीच्या कामातून लाभ संभवतो. कामाच्या ठिकाणी कौतुक केले जाईल.
▪कन्या : प्रलोभनापासून दूर राहावे. एकमेकांमधील प्रेमळ सहवास वाढीस लागेल. भागीदाराशी सुसंवाद साधला जाईल. तुमचे संपर्क क्षेत्र वाढेल.
▪तूळ : नातेवाईकांची मदत घेता येईल. हातात नवीन अधिकार येतील. आकर्षणाला बळी पडू नका. हाताखालील लोकांकडून सहकार्य मिळेल.
▪वृश्चिक : सहवासातून मैत्री घट्ट होईल. स्त्रियांशी ओळख वाढेल. छंद जोपासण्यास वेळ देता येईल. कलात्मक दृष्टीकोन ठेवाल.
▪धनू : जवळचा प्रवास घडेल. कामाचे योग्य नियोजन कराल. सारासार विचार करण्यावर भर द्यावा. घरातील वातावरण खेळीचे राहील.
▪मकर : जबाबदारीची जाणीव ठेवून वागाल. सामुदायिक गोष्टींमध्ये सावधतेने वागावे. प्रवासात काळजी घ्यावी. आध्यात्मिक बळ वाढवावे.
▪कुंभ : मित्रांशी मतभेद संभवतात. घाई घाईने कोणतेही निर्णय घेऊ नका. क्षुल्लक गोष्टींवर प्रतिक्रिया देणे टाळा. आवडीच्या गोष्टींमध्ये मन रमवावे.
▪मीन : आनंदी दृष्टिकोन ठेवून वागावे. कामातील बदल जाणून घ्यावेत. बदलाकडे सकारात्मकतेने पहावे. फसवणुकी पासून सावध रहा.

from https://ift.tt/SwJ2ZRO

By News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *