▪मेष : मन अस्थिर राहील. अनावश्यक खर्च टाळावा. दिवसाची सुरुवात दमदार होईल. राग अनावर होऊ शकतो.
▪वृषभ : तुमचा आनंद द्विगुणित होईल. संयम सोडून वागू नका. जुन्या मित्रांची गाठ पडेल. कष्टाचे फळ मिळेल.
▪मिथुन : कष्टाचे फळ थोड्या अवधीने मिळेल. अनावश्यक खर्च वाढू शकतो. आनंदी वृत्ती ठेवावी. आज थकवा जाणवेल.

▪कर्क : उत्साह कमी पडू देऊ नका. नातेवाईक मदतीला येतील. नवीन विचार जाणून घेता येतील. कमी नवीन कामे अंगावर पडतील.
▪सिंह : अधिकाराचा योग्य वेळी वापर करावा. प्रवासात काळजी घ्यावी. हातापायाला किरकोळ जखम संभवते. शांततेचे धोरण ठेवावे.
▪कन्या : वस्तूंची गरज लक्षात घेऊन खरेदी करावी. चोरांपासून सावध राहावे. उगाचच कोणाचा राग मनात धरून ठेऊ नका. स्वभावात उधळेपणा येईल.

▪तूळ : चिडचिड करू नका. जवळच्या व्यक्तीशी मनमोकळे बोलावे. फार त्रास करून घेऊ नका. समतोल साधण्याचा प्रयत्न करावा.
▪वृश्चिक : डोळ्यांची वेळेवर तपासणी करावी. पत्नीच्या आरोग्याची काळजी घ्यावी. मुलांची उत्तम साथ मिळेल. पायाचे त्रास जाणवतील.
▪धनू : हाताखालील लोकांशी नीट वागावे. कामात जोडीदाराची मदत घ्याल. मुलांच्या मनात आदर निर्माण होईल. संतती सौख्य उत्तम लाभेल.

▪मकर : आळस झटकून काम करावे लागेल. वडीलधार्‍यांची सेवा कराल. मोठ्यांचा आशीर्वाद लाभेल. हातातील कामात चिकाटी ठेवा.
▪कुंभ : तुमच्यातील हुशारी दिसून येईल. कुटुंबात मन रमेल. प्रवास त्रासदायक ठरू शकतात. नातेवाईकांना नाराज करू नका.
▪मीन : मनात उगाचच भलत्या शंका आणू नका. हातातील कामाला प्राधान्य द्यावे. ध्यानधारणा करावी. कामानिमित्त घरापासून दूर राहावे लागेल.

from https://ift.tt/3nHNkQy

By News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *