📌आजचे 12 राशींचे राशिभविष्य

Table of Contents

▪मेष : आज वेळेचा सदुपयोग कराल. जास्त विचार करत बसू नका. जोडीदारासोबत पुढील गोष्टींचे नियोजन कराल.
▪वृषभ : कामात जरासा सुस्तपणा जाणवेल. गोडीने सर्वांना जिंकून घ्यावे. कामाच्या ठिकाणी सहकारी मदत करतील.
▪मिथुन : आज विद्यार्थी वर्ग खुश असेल. प्रिय व्यक्ती सोबत फिरायला जाल. हाताखालील लोक चोख काम करतील. त्यांच्या सोबत वेळ घालवून मस्त वाटेल.
▪कर्क : दिवस मनाजोगा व्यतीत कराल. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. दिवस समाधानात जाईल. जोडीदारासोबत फिरायला जाल.
▪सिंह : तरुण वर्ग आळसात दिवस घालवेल. जवळच्या ठिकाणाला भेट द्याल. भावंडांमधील सामंजस्य वाढीस लागेल. मित्रांसमोर मनातील गोष्टी बोलून दाखवाल.
▪कन्या : उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. छोटासा घरगुती कार्यक्रम होईल. घरातील लोकांसोबत फिरायला जाण्याचा बेत आखाल. बोलण्यात गोडवा ठेवाल.
▪तूळ : आजचा दिवस मनाप्रमाणे घालवाल. आवडत्या कामात रस घ्याल. दिवस आनंदात जाईल. आवडते पुस्तक वाचनात येईल.
▪वृश्चिक : खर्चावर नियंत्रण ठेवावे. परदेशी कंपनीत काम करणार्‍यांना दिवस फलदायी असेल. वैचारिक शांतता जपावी. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल.
▪धनू : थोरांचा सल्ला मिळेल. व्यवसायिकांना चांगला लाभ होईल. जवळचे मित्र भेटतील. वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील.
▪मकर : नवीन गोष्टी शिकण्याकडे अधिक प्राधान्य द्यावे. शांततेचा मार्ग अंगिकारावा. कामाच्या ठिकाणी चांगली बातमी मिळेल. आपली क्षमता सुधारण्यावर भर द्यावा.
▪कुंभ : धार्मिक कामात सहभाग नोंदवाल. कोर्टाशी संबंधित कामे पुढे सरकतील. सामाजिक स्तरावर कौतुक केले जाईल. दानधर्म करता येईल.
▪मीन : जुगारात लाभ संभवतो. पोटाच्या तक्रारी संभवतात. उच्च शिक्षण घेणार्‍यांना फायदा होईल.

from https://ift.tt/oq5eI1E

Leave a Comment

error: Content is protected !!