▪मेष : हातातील कामात यश येईल. काही अनपेक्षित बदल जाणवतील. लहान मुलांच्यात रमून जाल. वरिष्ठांच्या मर्जीचे पालन करावे.
▪वृषभ : जिथे जाल तिथे आनंद वाटाल. खर्चाचे प्रमाण वाढू शकते. काही कामात अडकून पडल्यासारखे वाटू शकते. मनातील इच्छेला पूर्णत्व येऊ शकते.
▪मिथुन : आपल्या वागण्याने इतरांची मने जिंकून घ्याल. काही गोष्टी अनपेक्षितपणे लाभतील. आवडते खाद्यपदार्थ चाखायला मिळतील. तुमची समाजप्रियता वाढेल.
▪कर्क : जुनी कामे नव्याने सामोरी येतील. बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळावे. चिकाटी सोडून चालणार नाही. क्षुल्लक गोष्टींकडे दुर्लक्ष करावे.
▪सिंह : हाताखालील लोकांचे सहकार्य मिळेल. मनातील संकोच दूर सारावा. जवळच्या व्यक्तीजवळ मोकळे करावे. कामातून समाधान शोधाल.
▪कन्या : स्थावरची कामे मार्गी लागतील काही गोष्टी जाणीवपूर्वक कराव्या लागतील. घरातील समस्या जाणून घ्याव्यात. अचानक धनलाभ संभवतो. .
▪तूळ : कामे वेळेत पूर्ण करता येतील. उत्कृष्ट साहित्य वाचनात येईल. घरातील कामात अधिक लक्ष घालावे लागेल. तुमच्या अधिकारात वाढ होईल.
▪वृश्चिक : गरज पाहून खर्च करावा. फसवणुकीपासून सावध राहावे. मत्सराला बळी पडू नका. आवक-जावक यांचे योग्य गणित मांडावे.
▪धनू : डोकेदुखीचा त्रास जाणवेल. उतावीळपणा करून चालणार नाही. आपले कष्ट सार्थकी लावण्याचा प्रयत्न करावा. क्षुल्लक गोष्टींना फार महत्व देवू नका.
▪मकर : काही कामे तुमचा कस पाहतील. दिवस आपल्या मर्जीप्रमाणे घालवावा. जुन्या गोष्टी उगाळत बसू नका. जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडाल.
▪कुंभ : नवीन लोकांच्यात मिसळावे. मैत्रीचे संबंध जपावेत. पैशाचे गणित तपासून पहावे लागेल. कामात चंचलता आड आणू नका.
▪मीन : चांगला व्यावसायिक लाभ संभवतो. झोपेची तक्रार दूर करावी. तुमच्या कामाची योग्य दखल घेतली जाईल. हातातील कामात यश येईल.

from https://ift.tt/E07398v

By News

Leave a Reply

Your email address will not be published.

x