▪मेष : तरुण वर्गाला नवीन संधी मिळेल. घरात टापटीप ठेवाल. लोक तुमच्या व्यक्तिमत्वाकडे आकर्षित होतील. दिवस मजेत जाईल.
▪वृषभ : आवडत्या कामासाठी वेळ मिळेल.मनातील चुकीचे विचार बाजूला सारावेत. भावंडांचे सहकार्य मिळेल. मोठ्या लोकांच्यात वावराल.
▪मिथुन : जोडीदाराचे वर्चस्व राहील. कौटुंबिक सौख्य वाढीस लागेल. घरातील कामात मन रमेल. मौल्यवान वस्तू खरेदी केल्या जातील.
▪कर्क : सर्वांशी मिळून-मिसळून वागाल. आवडत्या गोष्टींमध्ये वेळ घालवाल. जोडीदाराची बाजू समजून घ्यावी. स्व‍च्छंदीपणे वागण्यावर भर द्याल.
▪सिंह : जोडीदाराच्या शांत स्वभावाची प्रचिती येईल. भावनेच्या भरात वाहून जाऊ नका. नामस्मरण करण्यात वेळ व्यतीत करावा. अंगीभूत कलेचे योग्य कौतुक केले जाईल.
▪कन्या : आरोग्यात सुधारणा होईल. मुलांच्या आनंदाने खुश व्हाल. उत्तम वाहन सौख्य लाभेल. स्थावरची कामे मार्गी लागतील.
▪तूळ : भागिदारीतून चांगली कमाई करता येईल. भावंडांचा विरोध होऊ शकतो. काही गोष्टींपासून जाणीवपूर्वक दूर राहावे. प्रलोभनाला बळी पडू नका.
▪वृश्चिक : गोड बोलण्यावर भर द्यावा. वस्तूंची उपयुक्तता लक्षात घेऊन खरेदी करावी. काही कामात अधिक श्रम घ्यावे लागतील. कामात उतावीळपणा करून चालणार नाही.
▪धनू : भावंडांचा सहवास लाभेल. स्वातंत्रप्रियता दर्शवाल. पारंपरिक कामात लक्ष घालावे लागेल. हातात नवीन अधिकार येतील.
▪मकर : कमिशनमधून चांगली कमाई होईल. जबाबदारीने वागणे ठेवाल. घराची साफसफाई काढाल. जोडीदाराचा प्रेमळ सहवास लाभेल.
▪कुंभ : परिस्थितीशी जुळवून घ्याल. हाताखालील लोकांचे उत्तम सहकार्य मिळेल. कामात समाधानी राहाल. जवळचे नातेवाईक भेटतील.
▪मीन : अपवाद नजरेआड करावेत. सर्वांना प्रेमाने आपलेसे कराल. सट्टा, जुगार यातून चांगली कमाई होईल. छंद जोपासायला वेळ काढाल.

from https://ift.tt/VdAEepl

By News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *