▪मेष : सर्वांशी आपलेपणाने वागाल. नवीन मित्र जोडले जातील. आपला दबदबा निर्माण कराल. इतरांना मदत करण्याचा आनंद घ्याल.
▪वृषभ : उष्णतेचे त्रास संभवतात. जवळचे नातेवाईक भेटतील. तुमच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जाईल. विषयाला उगाचच फाटे फोडू नका.
▪मिथुन : एकाच वेळी ढीगभर कामे अंगावर घेऊ नका. भावंडांशी सलोखा वाढेल. जोडीदाराचा हट्ट पुरवावा लागेल. विचारात एकसूत्रता आणावी लागेल.
▪कर्क : मनातील इच्छा पूर्ण होतील. तुमच्या मताचा आदर केला जाईल. घरगुती वाता वरणात गुंग व्हाल. आवडीचे पदार्थ चाखायला मिळतील.
▪सिंह : लोक तुमच्याकडे आकर्षिले जातील. जोडीदाराची प्राप्ती वाढेल. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. मुलांची काळजी लागून राहील.
▪कन्या : कामातून समाधान शोधण्याचा प्रयत्न करावा. स्थावरचे प्रश्न सोडवावेत. कामाच्या ठिकाणी कुशाग्र बुद्धीचा वापर कराल. घरात काही बदल करावे लागतील.
▪तूळ : हाता पायास किरकोळ इजा संभवते. तुमच्यातील महत्वाकांक्षा वाढीस लागेल. वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे. जवळच्या प्रवासात काळजी घ्यावी.
▪वृश्चिक : रागावर नियंत्रण ठेवावे. कुटुंबात आपले वर्चस्व गाजवाल कर्तृत्व दाखवण्याची संधी सोडू नका. कौटुंबिक प्रश्न चर्चेने सोडवावेत.
▪धनू : धार्मिक कार्यात हिरीरीने भाग घ्याल. वडिलोपार्जित कामे निघतील. आपली बुद्धिमत्ता दाखवण्याची संधि मिळेल. परोपकाराची जाणीव ठेवाल.
▪मकर : सामुदायिक वादात सहभाग घेऊ नये. कौटुंबिक खर्चाचा पुनर्विचार करावा लागेल. बोलण्याच्या भारात जबाबदारी घेण्याचे टाळावे. जुन्या गोष्टी उगाळत बसू नका.
▪कुंभ : हातातील कलेसाठी वेळ काढावा. कामाचा वाढता व्याप लक्षात घ्यावा. वडीलधार्‍यांचा सन्मान करावा. जोडीदाराचे मत मान्य करावे लागेल.
▪मीन : खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका. नातेवाईकांची मदत घेता येईल. सहकार्‍यांच्या साथीत रमून जाल. गोड बोलून सर्वांना आपलेसे कराल.

from https://ift.tt/jIizx5c

By News

Leave a Reply

Your email address will not be published.

x