📌आजचे 12 राशींचे राशिभविष्य

Table of Contents

▪मेष : बदलाला अनुसरून वागावे. मनातील विचित्र कल्पना काढून टाकाव्यात. काही गोष्टी लपविण्याकडे कल राहील. कामात स्त्रियांची मदत मिळेल.
▪वृषभ : कामाचे योग्य नियोजन करावे. उगाच विरोध करत बसू नका. भागीदारीत अधिक लक्ष घालावे. नवीन वस्त्र खरेदी कराल.
▪मिथुन : चैनीच्या वस्तू खरेदी कराल. जुन्या दुखण्यांकडे दुर्लक्ष करू नका. आपल्या वागण्याने इतरांची मने जिंकून घ्याल. चांगले औद्योगिक वातावरण लाभेल.
▪कर्क : जोडीदाराच्या स्वभावाची नवीन बाजू लक्षात येईल. मानसिक दोलायमानता जाणवेल. लिखाणात चांगली प्रगती करता येईल. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल.
▪सिंह : मुलांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. शेअर्सच्या कामातून लाभ संभवतो. पैज जिंकता येईल. धाडसाने कामे हाती घ्याल.
▪कन्या : जोडीदाराचा लाडिक हट्ट पुरवाल. आकर्षणाला बळी पडू नका. प्रेमसौख्याला बहर येईल. उत्तम गृहिणीपदाचा मान मिळेल.
▪तूळ : व्यसनाच्या आहारी जाऊ नका. दिवस काहीसा आळसात जाईल. लोकोपवादाकडे दुर्लक्ष करावे. नातेवाईकांची मदत घेता येईल.
▪वृश्चिक : छंद जोपासायला वेळ काढता येईल. गप्पा-गोष्टींची आवड पूर्ण कराल. जुगारातून लाभ संभवतो. निसर्ग सौंदर्यात रमून जाल.
▪धनू : उष्णतेचे विकार जाणवतील. प्रवासात काहीसा त्रास संभवतो. कामाची लगबग राहील. सारासार विचार करूनच निर्णय घ्यावा.
▪मकर : गैरसमजुतीतून वाद वाढू शकतो. धार्मिक कामात सहभाग घ्याल. दूरच्या प्रवासात काळजी घ्यावी. कर्ज प्रकरणात सध्या अडकू नका.
▪कुंभ : जवळचा प्रवास घडेल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. मदत करतांना मागे-पुढे पाहू नका. निसर्गाच्या सानिध्यात रममाण व्हाल.
▪मीन : तुमच्या व्यक्तिमत्वाची उत्तम छाप पडेल. प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्याल. बौद्धिक चलाखी दाखवाल. शांत व विचारी निर्णय घ्याल.

from https://ift.tt/Tw59oDq

Leave a Comment

error: Content is protected !!