बॉलिवूडमध्ये असेही काही कलाकार होऊन गेले आहेत. ज्यांचे एकतर्फी प्रेम नेहमीच चर्चेचा विषय राहिले आहेत. चला, तर आज अशाच काही कलाकारांबद्दल जाणून घेऊयात…
▪ करण-ट्विंकल : दिग्दर्शक करण जोहरचे अभिनेत्री ट्विंकल खन्नावर प्रेम होते. त्याने तिला आपल्या मनातल्या भावना सांगण्याचा प्रयत्न केला मात्र तिने नकार दिला. सध्या करण अजूनही सिंगल आहे. हे त्याच्या एकतर्फी प्रेमाची निशाणी आहे.

▪ संजीव-हेमा : अभिनेते संजीव कुमार यांचं हेमा मालिनीवर एकतर्फी प्रेम होते. हेमा-धर्मेंद्र यांचे अगोदरच सूर जुळल्यामुळे संजीव यांनी लग्न न करण्याचा निर्णय घेतला. वयाच्या 47व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
▪ गुरुदत्त-वहिदा : लग्न झाल्या नंतरही दिग्गज अभिनेते गुरु दत्त वहिदा रेहमान यांच्या प्रेमात पडले होते. मात्र ही बातमी गुरु दत्त यांच्या पत्नी गीता यांना पटली नाही. यामुळेवहीदा यांनी गुरु दत्त यांना कधीही न भेटण्याचा निर्णय घेतला. या धक्क्यामुळे गुरु दत्त व्यसनाधीन झाले. त्यांनी आत्महत्या करत स्वतःचे आयुष्य संपवले.

▪ सुलक्षणा-संजीव : अभिनेत्री सुलक्षणा पंडीत यांनी संजीव कुमार यांना लग्नाची मागणीही घालत प्रेम व्यक्त केले. मात्र संजीव यांच्या मनात हेमा मालिनी असल्याने त्यांनी त्या प्रस्तावाचा होकार दिला नाही.
▪ जिया-सुरज : अभिनेत्री जिया खानचं सूरज पांचोलीवर प्रेम होतं. मात्र सूरज या नात्याकडे गांभीर्याने पाहत नव्हता. जेव्हा जियाने सूरजला लग्नासाठी विचारले होते. तेव्हा त्याने नकार दिला. यामुळे नैराश्यग्रस्त जियाने आत्महत्या केल्याचे बोलले जाते.

from https://ift.tt/34GmAbX

By News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *