वंदनीय हिंदुहृदयसम्राट,शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतीदिन. चला, तर त्यांच्या प्रेरणादायी विचारांना उजाळा देण्याचा प्रयत्न करूयात…
● तुमच्याकडे आत्मबल असेल तर जगाच्या पाठीवर कुठेही जा तुम्हाला मरण नाही.
● नोकऱ्या मागणाऱ्यांपेक्षा नोकऱ्या देणारे होऊ, ही महत्वकांक्षा बाळगा.

● जीवनात एकदा निर्णय घेतला की, मागे फिरू नका. कारण मागे फिरणारे इतिहास रचू शकत नाही.
● पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना पायाखाली तुडवायला माझ्या आदेशाची वाट पाहू नका.
● मला जे देश हिताचे असेल ते मी करत राहणार मला खटल्यांची पर्वा नाही.
● माझ्या वडिलांच्या संस्कारामुळे भीती नावाचा शब्द माझ्या शब्दकोशात नाही.
● मुंबई आपली आहे आपली, इकडे आवाजही आपलाच हवा.

● एकजुटीने राहा जाती आणि वाद गाडून मराठी माणसांची भक्कम एकजूट उभारा तरच तुम्ही टिकाल आणि महाराष्ट्रही टिकेल.
● तोंड वाजवून न्याय मिळत नसेल तर तोंडात वाजवून न्याय मिळवा पण न्याय मिळालाच पाहिजे.
● वयाने म्हातारे झाले तरी चालेल पण विचाराने कधी म्हातारे नका होऊ.

from https://ift.tt/3Arw2fm

By News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *