हनुमंतरायांकडुन दास्यभक्ती शिकावी !

Table of Contents

दास्यभक्ती कशी करावी?त्याचं उत्तर उदाहरण हनुमंतराय आहे.तुकोबाराय म्हणतात,
हनुमंत महाबळी । रावणाची दाढी जाळी ॥१॥
तया माझा नमस्कार । वारंवार निरंतर ॥ध्रु॥
करोनी उड्डाण । केले लंकेचे दहन ॥२॥
तया माझा नमस्कार । वारंवार निरंतर ॥ध्रु॥
जाळीयेली लंका । धन्य धन्य म्हणे तुका ॥३॥
तया माझा नमस्कार । वारंवार निरंतर ॥ध्रु॥
सितामाईचं अपहरण रावणाने केल्यानंतर केवळ राम राम म्हणून शांत न बसता कर्तृत्व सिद्ध करणारा महाबली हनुमान थेट रावणाच्या राज्यात जाऊन लंकेत हाहाकार माजवला शेपटी पेटवल्यावर रावणाची दाढी जाळुन लंका दहन करुन येणारा धुरंधर रामभक्त.तुकोबाराय म्हणतात, अशा सदभक्ताला माझा वारंवार नमस्कार आहे.सत्य आहे तेथे राम आहे.
आपण नामस्मरण करण्यातच धन्यता मानतो.धर्मकार्यात विघ्न आले तर आपण तितक्या ताकदीने पेटुन उठत नाही. सामर्थ्य असुनही आपण शांत रहाण्यातच भलाई मानतो.देवाकडून आपल्या अपेक्षा असतात.अपेक्षा पुर्ण झाल्या नाही तर आपण देव सुद्धा बदलतो.पण देवाच्याही काही अपेक्षा भक्ताकडुन असु शकतात याचं मात्र आम्हाला भान रहात नाही. प्रभु श्रीरामांनी सितामाई शोधाची जबाबदारी हनुमंतरायांवर सोपवली.कारण त्या भक्ताच्या निस्सीम भक्तीची खात्री प्रभुंना होती.आपल्या भक्तीचं गारुड देवावर करण्याची क्षमता सामान्य नाही.
आपण हनुमंत रायांकडुन काय शिकावं?खास करुन तरुणांनी पिळदार शरीर बनवावे.आपल्या शक्तिचा उपयोग परोपकारासाठी करावा.अफाट शक्ती असुनही त्याचा दंभ होऊ नये म्हणुन दास्यभक्ती सर्वश्रेष्ठ आहे. शक्तीचा योग्य ठिकाणी वापर झाला तर त्याचा आनंदही मोठा आहे.गोरगरिबांवर आलेलं संकट निवारता आलं तर देवावरचं संकट दुर केल्याचा आनंद होतो.
रामकृष्णहरी

from https://ift.tt/m1nZzyO

Leave a Comment

error: Content is protected !!