
कऱ्हाड : राज्याच्या आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष तथा आदर्श गाव हिवरेबाजारचे सरपंच पोपटराव पवार यांना दिल्लीत राष्ट्रपती भवनात पद्मश्री पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. त्यानंतर त्यांनी कऱ्हाड येथे जाऊन महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री (स्व.) यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी येऊन त्यांना मिळालेला पद्मश्री पुरस्कार समाधीवर ठेवून अभिवादन केले.
देशातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीसाठी मानाचा ‘पद्मश्री’ पुरस्कार देण्यात येतो. पोपटराव पवार यांनी ग्रामविकास, जलव्यवस्थापन, वृक्षलागवड आदी क्षेत्रात काम केले. पवार यांचे शिक्षण एम.कॉम.पर्यंत झाले असून १९८९ मध्ये हिवरे बाजार येथील पहिले तरुण सरपंच म्हणून ते निवडून आले. त्यानंतर गावातील जल, मृदा आणि वन संधारण या कामामध्ये स्वतःला झोकून देत गावाचा कायापालट केला. आज हिवरे बाजार पूर्णतः दुष्काळमुक्त झाले असून राज्यात हिवरे बाजार पॅटर्न म्हणून प्रसिद्ध आहे. तसेच, त्यांनी पाणी फाउंडेशनमध्ये देखील सहभाग घेतला होता.
पाणी आणि स्वच्छता यापुरतंच मर्यादित न राहता पोपटराव यांनी अनेक सामाजिक विषयावर कार्य केलेले आहे.
आदर्श गाव हिवरेबाजार हे राज्यासह देशात प्रसिध्द आहे. या गावामध्ये विविध उपाययोजना दुष्काळात राबविल्या आहेत. याची दखल घेऊन त्यांना दिल्लीतील राष्ट्रपती भवनात पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यानंतर त्यांनी कऱ्हाडला यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी येऊन पद्मश्री पुरस्कार समाधीवर ठेवून अभिवादन केले.
महात्मा गांधींनी खेड्याकडे चला हा संदेश दिला होता. यशवंतराव चव्हाण यांनी पंचायत राज व्यवस्थेतूनच पुढे गेले, तर बलशाली भारताचे स्वप्न आपण साकार करु शकू असे सांगितले. हिवरे बाजारमध्य मला जे काम करता आले, त्याची प्रेरणा यशवंतरांवांची आहे, त्यामुळे दिल्लीत पद्मश्री मिळाल्यानंतर मी पहिल्यांदा कऱ्हाडला त्यांच्या समाधीस्थळी येऊन पदमश्री त्यांच्या समाधीवर ठेवून नतमस्तक झालाे, असे पवार म्हणाले.
from https://ift.tt/3cZHwLW