स्वैराचार हे अविचारी मनाचं लक्षण आहे !

Table of Contents

मनोमयकोशाच्या शुद्धिसाठी आपण गेल्या तिन भागांपासुन चिंतन करत आहोत.थोडा विषय भरकटल्या सारखाही वाटला असेल.पण मनोमयकोशाची रचनाच एवढी क्लिष्ट आहे की अन्नमयकोश,प्राणमयकोश आणि पुढे येणारा विज्ञानमय आणि आनंदमयकोश सुद्धा मननोमयकोशाशी निगडित आहे. 
मुळात हे कोश सगळे एकात एकच आहेत.त्यामुळे कपाट उघडल्यावर जसं त्यावेळी गरज नसलेल्या गोष्टी सुद्धा दिसतात तसं हे आहे.या कोशावर विजय मिळवता आला तर सर्व जग जिकंल्याचा आनंद प्राप्त होईल. कर्ता,कारण,क्रिया,प्रतिक्रिया,सुख,दुःख सगळं या दुकानातच मिळत असल्याने थेट जगणं प्रभावित होतं.जगण्याची विशिष्ट सवय या कोशातील वारंवारीतेच्या घटना नोंदीमुळेच होत असते.अनेक सिद्धांत नित्य जगण्यातुन तयार होतात आणि त्याची नोंद मनोमयकोशात जन्मोजन्मी तशीच रहाते.
जन्मोजन्मी हा शब्द तुम्हाला लगेच रुचणार नाही. त्यावर पुढे आपण बोलणारच आहोत.अमुक गोष्ट अशीच घडणार म्हणजे साधारण विषयात सुद्धा सिध्दांत निश्चिती असते.मनाला लागलेली ती सवय म्हटलं तरी चालेल.
मनाला अकळणं सामान्य बाब नसली तरी ते प्रयत्नसाध्य नक्कीच आहे. सुंदर जीवन जगण्याची कला कोशीय अभ्यासाने प्राप्त होते.मन प्रसन्न ठेवणे हे कोणत्याही एका कोशाचे काम नाही हे एव्हाना आपल्या लक्षात आले असेलच.काय खातो ?इतपासुन त्याची सुरुवात होते.
मनाला स्थिरत्व प्राप्त करण्यासाठी प्रत्येक मनुष्य प्रयत्न करतच असतो.पण हे प्रयत्न म्हणजे सुई घरात हरवली आणि शोधाशोध अंगणात सुरू आहे,असे आहेत. मनापासून मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न आम्हाला मनशांतीचा प्रत्यय देणार आहे.
रामकृष्णहरी

from https://ift.tt/l9mVtZx

Leave a Comment

error: Content is protected !!