सिंधूताईंची अखेरची “ती” इच्छा पूर्ण होणार ?

Table of Contents

मुंबई : अवघ्या महाराष्ट्राला अनाथांची माय अशी ओळ्ख असलेल्या सिंधुताई सपकाळ यांचे नुकतेच निधन झाले.त्यांच्या निधनाने राज्यासह देशाने शोक व्यक्त केला. राज्यातील मुख्यमंत्री, मंत्री, कलाकार सर्व सामान्य जनता व भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा श्रध्दांजली वाहिली.
ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सकपाळ यांनी प्रत्येक भाषणात आपली एक खंत मात्र व्यक्त केली होती. माईंचे पुस्तक कर्नाटकातील दहावीच्या अभ्यासक्रमात आलेले आहे, मात्र महाराष्ट्र सरकारने त्यांच्या कार्याची दखल घेतली नाही ही शोकांतिका मांडलेला एक व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल होत आहे.
महाराष्ट्रात मोठ व्हायचं असेल तर त्यासाठी मरावं लागतं आणि मेलेला माणूसच मोठा होतो अशी शोकांतिका आपल्या राज्याची आहे असं मत त्या व्हिडिओमध्ये मांडलेलं आहे. मेल्यानंतर जिथे माणसं मोठी होतात तो महाराष्ट्र आहे, हे दु:ख आहे. सोन्यासारखी माणसे या मातीमध्ये जन्माला आली अशा प्रकारचा तो व्हिडिओ होता. महाराष्ट्रात जन्मलेल्या सिंधुताईंची अखेरची इच्छा आता शिक्षण विभागाने पूर्ण करावी असा सूर शिक्षण क्षेत्रात उठत आहेत.
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लक्ष घालून सर्वसामान्यांची इच्छा पुर्ण करावी असा एक संदेश समाजात फिरत होता. ती क्लिप व सिंधुताई सपकाळ यांची खंत हंसराज मोरारजी पब्लिक स्कूल अंधेरी येथील शिक्षक उदय नरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांना पाठवली. मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेऊन ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या कार्याची दखल घेण्याची सुचना शालेय शिक्षण विभागाला केली आहे व तशा आशयाचं एक पत्र शालेय शिक्षण विभागांच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांना पाठवले आहे. सिंधुताई सपकाळ यांच्या कार्याचा व मानवतावादी दृष्टिकोन लवकरच शालेय अभ्यासक्रमात पहायला मिळेल असा आशावाद शिक्षकवर्ग व्यक्त करत आहे.

from https://ift.tt/3FclfpK

Leave a Comment

error: Content is protected !!