
शेकडो अनाथ, निराधार जीवांना आपल्या मायेच्या पदराखाली आधार देणाऱ्या ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. आज त्या शरीररुपाने आपल्यात नसल्या तरी विचार रूपाने त्या आपल्यात जीवनात कायमच्याच असतील. म्हणूनच त्यांचे प्रेरणादायी विचार जाणून घेऊयात…
देवा आम्हाला हसायला शिकव परंतु आम्ही कधी रडलो होतो हे विसरू देऊ नकोस.
रात्रीच्या अंधाराला घाबरू नका, पहाटेची वाट पहा एक दिवस तुमचाही उजाडेल!
तुम्ही या जीवनात खूप मोठे व्हा, परंतु या मातीशी असलेले नाते विसरू नका.
मला जीवन जगण्याचा आत्मविश्वास आणि मार्ग स्मशानभूमीतून मिळाला.
बाहेरचे दिवे विझतात म्हणून आतून पेटायला शिका.
जर तुम्हाला स्वतःसाठी जगायचे नसले तर इतरांसाठी जगायला शिका.
तुम्ही पुढे जरुर जा पण कधीतरी मागे वळून पहायला विसरू नका.
आपल्या जीवनात प्रकाश नक्कीच येणार आहे, तुम्ही फक्त जीवन जगायला शिका.
दुःखी माणसाचे दुःख फक्त दुःखी माणूसच समजू शकतो.
दुसऱ्याचे दुःख वाटून घेतले की, माणूस स्वतःचे दुःख आपोआप विसरतो.
मनुष्याची भूक वाईट असते. माणूस कधीच वाईट नसतो.
जीवनात कधी संकटे आली तर त्यावर पाय देऊन उभे रहा, त्यामुळे संकटांची उंची कमी होईल.
from https://ift.tt/32ZWMGZ