भाळवणी : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच आज महिला महिलांचे सक्षमीकरण झाले असून त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून भावी पिढीने वाटचाल करावी असे प्रतिपादन राज्याच्या आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांनी केले.
आमदार निलेश लंके यांच्या प्रयत्नातून तसेच पंचायत समितीच्या उपसभापती सौ. सुनंदाताई सुरेशशेठ धुरपते यांच्या निधीतून आणि स्थानिक स्कुल कमिटीच्या सल्लागार समितीचे सदस्य बबलूशेठ रोहोकले यांच्या पाठपुराव्याने भाळवणी येथील महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते सिमेंट ब्लॉक बसविण्याचा शुभारंभ करण्यात आला यावेळी सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधून श्री.पवार बोलत होते.
याप्रसंगी बोलताना पद्मश्री पोपटराव पवार म्हणाले की, आपण दरवर्षी देशातील आयपीएस, आयएस झालेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मसुरी येथे जात असतो या ठिकाणी जास्तीत जास्त उच्चपदस्थ महिला वर्ग विविध पदांवर कार्यरत आहे. सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच महिलांना उच्च पदावर संधी मिळाल्याचे सांगतच या ठिकाणी शिक्षण घेणारी उच्चपदस्थ विद्यार्थी हे सर्वसामान्य विद्यालयामधूनच शिकल्याचेही श्री. पवार यांनी सांगितले.
यावेळी प्राचार्य श्री. कोऱ्हाळे,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब तरटे, बाबुशेठ रोहोकले तसेच शिक्षक वृंद व ग्रामस्थ उपस्थित होते

from https://ift.tt/3mNR6qr

By News

Leave a Reply

Your email address will not be published.