
सुपा: येथे सुजित झावरे पाटील यांच्या प्रयत्नातून मंजूर करण्यात आलेल्या हाडोळा वस्ती येथील जुनी धबधबी बंधाराचे भूमिपूजन सुजित झावरे पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. सदर बंधारा होणेबाबत गावातील ग्रामस्थांनी सुजित झावरे पाटील यांची भेट घेऊन बंधाऱ्यासाठी निधी उपलब्ध करणेबाबत मागणी केली होती. अवघ्या वर्षाच्या आत सुजित झावरे पाटील यांनी सदर बंधाऱ्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून १५.०० लक्ष रु. निधी मंजूर केले.
यावेळी सदर बंधाऱ्यासाठी निधी मंजूर केल्याबद्दल सुपा तसेच वाघुंडे येथील ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करून आभार व्यक्त केले. सदर बंधाऱ्याचा फायदा सुपा तसेच वाघुंडे तसेच परिसरातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर होणार आहे.
यावेळी सुजित झावरे पाटील म्हणाले की, तालुक्यातील राजकीय परिस्थिती अत्यंत अस्थिर आहे. कुठेही स्थिरता दिसत नाही अशा प्रतिकूल परिस्थितीत देखील जनतेच्या मूलभूत सुविधा पुरविणे हे आपले लक्ष्य आहे. या संघर्षाच्या काळात देखील तालुक्यातील जनतेच्या सेवेसाठी विकासकामांचा ओघ चालूच राहणार आहे.
यावेळी भाजपा महिला जिल्हाध्यक्षा अश्विनीताई थोरात, सरपंच मनीषा योगेश रोकडे, उपसरपंच सागर मैड, माजी सभापती दिपक पवार, सुनीलजी थोरात, योगेश पवार, दत्तात्रय पवार, चिंचोलीचे माजी सरपंच सतीश पिंपरकर, अमोल मैड, विलास पवार, बी.एस.पवार, राहुल पवार, प्रताप शिंदे, सुरेश नेटके, पप्पू पवार, संतोष वाळुंज, भास्कर पवार, डॉ. रोहन जाधव, नम्रता पवार, सुनीता पवार, कल्पना कदम, सचिन वाढवणे, प्रीतेश टकले, हरिदास मगर, वसंत मगर, संपत मगर, मधुकर पठारे, विजय पवार, सचिन जाधव, रिकी जाधव, देवेंद्र जाधव, भरत जाधव, दादा जाधव, बाळू शिंदे, मधुकर अवचिते, भोला अवचिते, प्रवीण अवचिते, प्रवीण पवार, संतोष मगर, बापूसाहेब झंजाड तसेच सुपा व परिसरातील ग्रामस्थ उपस्थितीत होते.
from https://ift.tt/3DYTAZZ