श्री.स्वामी समर्थ सहकारी बँकेला ५ कोटी २४ लाखांचा करपूर्व नफा !

Table of Contents

पारनेर : नगर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात अग्रगण्य असणारी श्री स्वामी समर्थ सहकारी बँक आपले रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करत असून बँकेला चालू आर्थिक वर्षामध्ये ५ कोटी २४ लाख रुपये करपूर्व नफा झाला असून त्यामधून २ कोटी ९६ लाखाच्या तरतुदी करुन निव्वळ नफा २ कोटी २८ लाख रुपये झाल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष ॲड.अशोकराव शेळके यांनी दिली.
बँकेच्या मार्चपर्यंत चालू आर्थिक वर्षात ठेवींमध्ये १२ कोटींची वाढ झालेली असून खेळते भांडवल मध्ये १५ कोटींची वाढ झालेली आहे. उत्कृष्ट व्यवस्थापन तसेच काटकसरीने कारभार करत असताना स्थापनेपासून रौप्यमहोत्सवी वर्षापर्यंत बँकेने आतापर्यंत मुख्य कार्यालयासह ११ शाखांच्या माध्यमातून १९१ कोटी ४१ लाख रुपये ठेवीचा टप्पा गाठला असून ९९ कोटी ७१ लाख रुपये कर्ज वाटप केलेले आहे.बँकेचे खेळते भांडवल २२७ कोटी ८४ लाख असून गुंतवणूक ११३ कोटी ४४ लाख इतकी आहे.
चालू आर्थिक वर्षात बँकेचा सी डी रेशो ५२.१०% तर सी आर ए आर २३.८६% इतका आहे..बँकेकडील स्वनिधी २० कोटी ८४ लाख रुपये असून बँकेची नेट वर्थ २४ कोटी ९६ लाख रुपये आहे.कर्जाच्या वसुलीबाबत कोरोनाच्या कालावधीत सुद्धा बँकेने उत्कृष्ट कामगिरी करताना ढोबळ एन पी ए.चे प्रमाण १.१५% राखत निव्वळ एन.पी.ए.०% ठेवला असल्याची माहिती ॲड.अशोकराव शेळके यांनी दिली.बँकेने गेल्या २५ वर्षाच्या कालावधीत ग्रामीण भागातील ग्राहकांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण सेवा देत असताना जनतेचा आर्थिक स्तर उंचावण्याच्या दृष्टीने काम केलेले आहे.भारतीय रिझर्व्ह बँकेने घालून दिलेले आर्थिकदृष्ट्या सक्षम व उत्कृष्ट व्यवस्थापन हे सर्व निकष चालू वर्षात बँकेने पूर्ण केलेले असून ग्राहकांना कोअर बँकिंग प्रणाली,आर.टी.जी.एस,एन.ई.एफ.टी,सी.टी.एस क्लिअरिंग,PMSY,PMJJBY, या सुविधा उपलब्ध करुन दिलेल्या आहे.
चालू आर्थिक वर्षात बँक आपले रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करत असून सभासद,ठेवीदार,कर्जदार,
कर्मचारी,हितचिंतक,ग्राहकांच्या विश्वासावर बँकेने २०० कोटी ठेवींचा टप्पा पार करण्याचे उद्दिष्ट ठेवतानाच प्राथमिक अग्रक्रम क्षेत्रातील दुर्बल,वंचित घटकांना सुरक्षित कर्जपुरवठा करण्याचे धोरण अवलंबिले असल्याची माहिती बँकेच्या व्यवस्थापन मंडळाचे चेअरमन रामदास आंधळे यांनी दिली यावेळी बँकेचे संचालक मंडळ,व्यवस्थापन मंडळ सदस्य,कर्मचारी वृंद उपस्थित होते.

श्री.स्वामी समर्थ सहकारी बँक बँकेला डिजीटल बँकिंग अंतर्गत रौप्यमहोत्सवी वर्षात भारतीय रिझर्व्ह बँकेकडून मोबाईल बँकिंग प्रणालीसाठी परवानगी मिळाली असून सदर रौप्यमहोत्सवी वर्षात बँकेच्या वतीने ग्राहकांसाठी मोबाईल बँकिंग,फोन पे,गुगल पे,नेट बँकिंग,एटीएम सुविधेची अनोखी भेट देण्यात येणार असल्याची माहिती बँकेचे मार्गदर्शक ज्येष्ठ व्यवस्थापन मंडळ सदस्य भास्करराव शेळके साहेब यांनी दिली.

from https://ift.tt/jIGYKp2

Leave a Comment

error: Content is protected !!