
पारनेर : तालुक्यातील वासुंदे येथील श्री गुरुदत्त मल्टीस्टेट पतसंस्थेला यंदाच्या आर्थिक वर्षात १ कोटी ७५ लाख रूपयांचा नफा झाला असून संस्था लवकरच शंभर कोटी रुपयांच्या ठेवीचा आकडा पार करणार असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बा. ठ .झावरे यांनी दिली.
या संदर्भात माहिती देताना संस्थापक अध्यक्ष श्री. झावरे म्हणाले की,संस्थेच्या मार्च २०२२ या आर्थिक वर्षात ठेवींमध्ये २२ कोटी ११ लाख रुपयांची तर कर्जामध्ये १९ कोटी ५२ लाख रुपयांची वाढ झाली असून संस्थेने मुख्य कार्यालयासह ७ शाखांच्या माध्यमातून अवघ्या १० वर्षाच्या कालावधीमध्ये ८१ कोटी २७ लाख रुपये ठेवींचा टप्पा पार केला असून कर्ज वाटप ६७ कोटी ९५ लाख रुपये केले आहे.संस्थेने विविध बँकामध्ये १९ कोटी ३५ लाख इतकी सुरक्षित गुंतवणुक केली आहे. संस्थेचा एकुण व्यवसाय १४९ कोटी २२ लाख रूपयांचा झाला असून दि.३१ मार्च २०२२ अखेर थकबाकीचे व एनपीएचे प्रमाण अत्यल्प राखण्यात यश आल्याचेही श्री.झावरे यांनी सांगितले.
ग्रामीण व शहरी भागामध्ये संस्थेने अत्याधुनिक बँकिंगकडे वाटचाल करताना खातेदारांना अचुक व तत्पर सेवा देण्याच्या हेतूने तसेच सभासदांना कोणत्याही शाखेतून रक्कम काढता यावी व टाकता यावी यासाठी आधुनिक व नविन तंत्रज्ञावर आधारित कोअर बँकिंग प्रणालीचा स्विकार केला आहे. ग्राहकांना अत्याधुनिक व सर्व प्रकारच्या आवश्यक बँकिंग सेवा उपलब्ध झाल्याने संस्थेविषयीची विश्वासार्हता वाढण्यास मदत झालेली आहे,संस्थेच्या माध्यमातून सभासद व ग्राहकांना सध्याच्या डिजीटल युगात अत्याधुनिक बँकिंग सुविधा उपलब्ध केल्या असून तात्काळ बँकिंगच्या माध्यमातून क्यू.आर. कोड, आय.एम.पी.एस, एन.ई.एफ.टी,आर.टी.जी.एस,मिनी एटीएम तसेच श्री गुरुदत्त मल्टीस्टेट पतसंस्थेचे स्वतःचे यूपीआय अॅप व क्यूआर कोड सुविधा उपलब्ध झाल्याने ग्राहकांना मोबाईल नंबरवरून पैसे पाठवणे किंवा मोबाईल नंबरवरून पैसे मागविणे सहज शक्य होणार आहे,या सेवेचा फायदा ग्रामीण तसेच शहरी भागातील व्यवसायिकांना मोठया प्रमाणात होणार असून ग्राहकांचे आर्थिक व्यवहार जलद आणि सुलभ होण्यास मदत होणार आहे.
सहकार क्षेत्रामध्ये काम करीत असताना ठेवीदार,कर्जदार व कर्मचारी या त्रिसुत्रिचा पतसंस्था चळवळीत चांगला मेळ बसला तर मोठी आर्थिक क्रांती या माध्यमातून उभी राहू शकते. संस्थेवर सभासदांनी दाखविलेल्या विश्वासास तडा जाऊ न देता सर्व संचालक मंडळ,सभासद, ठेवीदार, कर्जदार, सर्वसामान्य ग्राहक , हितचिंतक व कर्मचारी वर्ग यांच्या बळावर संस्था प्रगतीपथावर नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न भविष्यकाळातही करणार आहे. संस्थेंच्या १०० कोटी ठेवींचा टप्पा लवकरच पार करणार असून संस्थेवर टाकलेल्या विश्वासाबद्दल सभासद ,ठेवीदार,कर्जदार व ग्राहकांचे संस्थापक अध्यक्ष बा. ठ.झावरे यांनी आभार मानले.
from https://ift.tt/6hroF8B