
पीएम किसान सन्मान निधीचा दहावा हप्ता जारी करण्यात आला असून याद्वारे दहा कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात 20 हजार कोटी रुपये हस्तांतरित केले आहेत. आत्तापर्यंत या योजनेचे 9 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत. तुम्हालाही पीएम किसान सन्मान निधीच्या यादीत तुमचे नाव तपासायचे असेल, तर तुम्ही खालील सोप्या स्टेप्स फॉलो करा…
● सर्वप्रथम अधिकृत वेबसाईट https://pmkisan.gov.in वर जा
● त्यानंतर ‘शेतकरी कॉर्नर’ या पर्यायावर क्लिक करा.
● आता राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडा.
● ‘Get Report’ वर क्लिक करा.
● आता तुमच्या समोर एक लिस्ट ओपन होईल, त्यामध्ये तुमच्या खात्याची स्थिती कळेल.
400 रुपये कोणाला मिळणार? : ज्या शेतकऱ्यांना नवव्या हप्त्याचा लाभ मिळाला नाही, त्यांच्या खात्यात दोन्ही हप्त्यांचे पैसे एकत्र जमा होणार आहेत. मात्र ही सुविधा फक्त त्या शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहे ज्यांनी 30 सप्टेंबरपूर्वी नोंदणी केली आहे.
यादीत नाव नसेल? तर येथे कॉल करा : 155261 आणि 011-24300606 हे क्रमांक आहेत. या ठिकाणी तुमचा संपूर्ण मुद्दा ऐकला जाईल आणि त्यावर तोडगाही काढला जाईल.
from https://ift.tt/3Jz0Q1L