
शिरूर : भारतीय जनता पार्टी विद्यार्थी आघाडीचे पुणे जिल्हाध्यक्ष विशाल घायतडक यांनी आमदार अशोकबापू पवार यांच्या उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांसह पक्षप्रवेश केला. त्यांच्यासमवेत बंटीशेठ घायतडक, शिरूर तालुका भाजपा सरचिटणीस पप्पूशेठ वाळके यांनीही यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला.
दोन दिवसापूर्वीच वढू बुद्रुकचे माजी सरपंच प्रफुल्ल शिवले आणि शिंदोडीचे विद्यमान सरपंच अरुण खेडकर यांनी आमदार अशोक पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता.
आज तालुकाध्यक्ष रवीबापू काळे, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र जगदाळे पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश बाप्पू पवार, संतोष लंघे, दत्तात्रय देशमुख, दादा लोखंडे, आप्पा वाळके, करडे गावचे सरपंच सुनील इसवे, भास्कर वाळके व इतर मान्यवर उपस्थित होते.
आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेले विशाल घायतडक आणि त्यांचे कार्यकर्ते हे पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच कार्यकर्ते असून स्थानिक पातळीवरील राजकारणामुळे ते काहीसे दूर गेले होते मात्र आज ते पुन्हा पक्षात परतत आहेत. या सर्व कार्यकर्त्यांना यापुढे पक्षात सन्मानाची वागणूक दिली जाईल, अशी प्रतिक्रिया आमदार अशोक पवार यांनी यावेळी दिली.
from https://ift.tt/BF8YpXe