
पारनेर : केवळ तालुक्यातच नव्हे तर नगर -पुणे जिल्ह्यात राजकारण व कुस्तीक्षेत्रात आघाडीवर असणारे नुसते नाव उच्चारले तरी समोर उभे राहतात ते मधुकर उचाळे ! ज्यांनी आपल्या कार्यकर्तुत्वावर ठसा उमटवित शिरापूर या मातृभूमीत गेल्या ३० वर्षांपासून ग्रामपंचायत व सेवा संस्था बिनविरोध होण्याची परंपरा यंदाही कायम राखली.
शिरूरच्या सी.टी. बोरा महाविद्यालयात उच्चशिक्षण घेत असतानाच मधुकर उचाळे यांनी नगर -पुणे जिल्ह्यात प्रतिथयश मल्ल म्हणून नावलौकिक मिळविले. शिरापूरचा बाळा पैलवान म्हणून ते प्रसिद्ध होते. त्यांच्या या कार्याची गावाने दखल घेवून त्यांना सरपंच केले. लालमातीचा आखाडा गाजविणारे उचाळे पैलवानांनी राजकिय मैदानात केवळ उडीच घेतली नाही तर पहिल्याच प्रयत्नात ते यशस्वीही झाले.
मधुकर उचाळे या उमद्या युवकाला काँग्रेस पक्षाकडून जिल्हा परिषदेची उमेदवारी मिळाली. कुस्तीचे डावपेज माहिती असणाऱ्या या राजकिय मल्लाने समोरच्यांना अस्मान दाखवित जिल्हा परिषदेची निवडणूक जिंकत कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापतीपदही पटकावले. या यशानंतर त्यांनी मागे पाहिलेच नाही.
तालुक्याचे ‘किंगमेकर’ असलेल्या मधुकर उचाळे यांनी गेल्या तीस वर्षांपासून सेवा संस्था व ग्रामपंचायतीची एकहाती सत्ता मिळवित तालुक्यातच नाही तर जिल्ह्यात शिरापूर या गावाचे वेगळेपण जपले.
आज झालेल्या सेवा संस्थेच्या निवडणूक बिनविरोध करण्यातही श्री. उचाळे यांना यश आले असून
दत्तात्रय गेनभाऊ नरसाळे,गोविंद साहेबराव चाटे,अंकुश विठोबा वडणे,संतोष बाबाजी शिनारे,मच्छिंद्र खंडू उचाळे,
गुलाबबाई सदानंद पाटील,उषा मारुती गाडगे,सचिन श्रीराम शिनारे,बंटी दाते,शिवाजी दाते,ज्ञानेश्वर साळवेसंदीप तुकाराम खाडे यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीबद्दल नवनिर्वाचित संचालकांचे आमदार निलेश लंके यांनी अभिनंदन केले आहे.
from https://ift.tt/vwG4kT8