पारनेर : तालुक्यातील भाळवणी येथील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र गोविंदराव चेमटे यांनी आपल्या कन्येच्या वाढदिवसानिमित्त भाळवणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून वाढदिवस साजरा केला.
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र चेमटे यांची कन्या श्रेया हिचा सोमवारी वाढदिवस होता. परंतु वाढदिवसाच्या अनावश्यक खर्चाला फाटा देऊन त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले. यापूर्वीदेखील शालेय व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष संतोषशेठ चेमटे यांनी वडील गोविंदराव चेमटे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ प्राथमिक शाळेसाठी व्यासपीठ बांधून दिले आहे.
श्रेयाच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटप करताना मुख्याध्यापक श्रीपती आबूज, शिक्षिका छायाताई रोहोकले, बबन मते, उज्वला पळसकर,श्री.दरेकर,रुपनर,सिनारे,मीनाताई कदम,श्रावणी चेमटे आदी यावेळी उपस्थित होते. या सामाजिक उपक्रमाचे भाळवणीत कौतुक होत आहे.

from https://ift.tt/3DPxuZG

By News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *