
मुंबई : आगामी पाच राज्यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही सज्ज झाला आहे. आगामी ५ राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपैकी राष्ट्रवादी पक्ष तीन राज्यांत निवडणूक लढणार असल्याचे स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल पत्रकार परिषद घेत सांगितले. तसेच यानंतर याबाबत राष्ट्रवादीने रणनिती ठरवली असून त्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला.
यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशातील भाजपाच्या राजकीय घडामोडींवर निशाणा साधला. मला नेतृत्व नको, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आधीच स्पष्ट केले आहे. सर्वांनी एकत्र येऊन पर्याय निर्माण केला पाहिजे, अशी पवारांची भूमिका आहे. त्यामुळे शरद पवार हे पंतप्रधानपदाचे उमेदवार नाहीत, असे नवाब मलिक यांनी जाहीर केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीची मुंबईत बैठक झाली. या बैठकीत महामंडळ, महाराष्ट्रातील पक्षाचे संघटन आणि इतर राज्यातील निवडणुका या संदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच भाजपाला पर्याय देण्यासाठी शरद पवार गेल्या अनेक दिवसांपासून काम करत आहेत. पवारांनी नेतृत्वाची भूमिका यापूर्वीच स्पष्ट केली आहे. त्यामुळे शरद पवार हे पंतप्रधानपदाचे उमेदवार असणार नाहीत, असे मलिक यांनी स्पष्ट केले.
from https://ift.tt/3Gm1Vrz