व्हॉट्सअ‍ॅपवर मिळवा लसीकरण प्रमाणपत्र!

Table of Contents

सध्या जवळपास सर्वच ठिकाणी कोरोना लसीकरण प्रमाणपत्र सक्तीचं बनलं आहे. मात्र अनेकांना लसीकरणाचं प्रमाणपत्र कसं डाऊनलोड करावं? याबाबत पुरेशी माहिती नसते. म्हणूनच आज व्हॉट्सअ‍ॅपवर लसीकरण प्रमाणपत्र कसे मिळवायचे? याबाबत जाणून घेऊयात…    
खालील सोप्या स्टेप्स फॉलो करा :
● सर्वप्रथम तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवर +91 9013151515 हा नंबर सेव्ह करा.
● आता व्हॉट्सअ‍ॅप चॅट उघडून कोविड प्रमाणपत्र (covid certificate) असे टाईप करा.
● यानंतर तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर 6 अंकी OTP येईल.
● हा OTP व्हॉट्सअ‍ॅप चॅट बॉक्समध्येच टाईप करून पाठवा.
● हा OTP फक्त 30 सेकंदांसाठी असेल, हे लक्षात ठेवा.
● कुटुंबातील इतर सदस्यांच्या लसीकरणाच्या वेळी समान नंबर दिला असेल. तर ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला त्या सर्व सदस्यांच्या नावाचा पर्याय दिसेल. तो एंटर करून लसीकरण प्रमाणपत्र डाउनलोड करून घ्या.
अगदी घरबसल्या सोप्या पद्धतीने व्हॉट्सअ‍ॅपवर तुम्ही कोरोना लसीकरण प्रमाणपत्र मिळवू शकता.

from https://ift.tt/3HMwibc

Leave a Comment

error: Content is protected !!