
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. देशात कोरोनाची तिसरी लाट धडकली आहे तर दुसरीकडे ओमायक्रॉनची रुग्ण संख्या वाढली आहे. यावेळी ओमायक्रॉनच्या संसर्गाबद्दल काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. पॅनिक होऊ नका, पण पूर्णपणे खबरदारी घ्या, असे सांगत पंतप्रधानांनी लॉकडाऊनची शक्यता स्पष्ट शब्दात नाकारली आहे.
ओमायक्रॉनचा संसर्ग वाढत आहे. त्याबद्दल संपूर्ण माहिती घेतली आहे. गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत चर्चा झाली आहे. अनेक मुख्यमंत्र्यांसोबत महत्वपूर्ण चर्चा झाली आहे. ओमायक्रॉनचा संशय होता तो आता दूर झाला आहे. ओमायक्रॉनमुळे जास्त प्रमाणात संसर्ग होत आहे.
घरगुती उपचार जसे आयुर्वेदिक उपचार पद्धती आहे. सर्दी खोकल्यावर काढा दिला जातो, त्याचा वापर या हंगामात केला पाहिजे, हा वैद्यकीय उपचार म्हणून सांगत नाही तर घरगुती उपचार म्हणून सांगतोय, असेही पंतप्रधान म्हणाले. ‘आपल्याला कोरोनाविरोधात लढाईचा दोन वर्षांचा अनुभव आहे. आर्थिक परिस्थितीचे नुकसान होईल असे होऊ द्यायचं नाही. सामान्य लोकांचे आर्थिक नुकसान होऊ नये आणि आर्थिक गती कमी होऊ नये याची खबरदारी घेत आहोत’ असेही पंतप्रधान मोदी म्हणाले. ‘जिथून जास्त केसेस येत आहे, तिथे आपल्याला लक्ष द्यायचे आहे.
लसीकरण अभियानाला वर्ष पूर्ण होण्यासाठी अजून तीन दिवसबाकी आहे. 90 टक्के लोकांना पहिला डोस पूर्ण झाला आहे. दुसरा डोस 70 टक्के पूर्ण झाला आहे. भारत आता 3 कोटी किशोरवयीन मुलांचे लसीकरण पूर्ण करत आहे. आज राज्यांकडे लशीचा साठा उपलब्ध आहे. आरोग्य सेवकांना जितक्या लवकरच बुस्टर डोस लागेल ते चांगलं आहे, अशी सूचनाही पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांना केली.होमआयसोलेशनमध्ये जास्त उपचार झाले पाहिजे. होम क्वारंटाइनसाठी लागू केलेल्या नियमावलीचे पालन करा, त्यामुळे रुग्णालयात लोकांना जाण्याची गरज भासणार नाही आणि रुग्णालयात गर्दीही होणार नाही, असं आवाहन पंतप्रधानांनी केलं.
from https://ift.tt/3npAi9K