
भारतात आंतरजातीय विवाह सोहळ्यांची संख्या वाढावी आणि समाजातील जाती व्यवस्थेचा दबाव कमी व्हावा यासाठी केंद्र सरकारकडून आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना अडीच लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. या योजनेचे नाव डॉ.आंबेडकर फाउंडेशन असे आहे. याबाबत अधिक सविस्तर जाणून घेऊयात…
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला लग्नानंतर डॉ.आंबेडकर फाऊंडेशनकडे अर्ज करावा लागेल. तुम्हाला हा अर्ज लग्नानंतर एक वर्षाच्या आत करावा लागेल.
याचा लाभ घेण्यासाठी लग्न करणाऱ्या दोन व्यक्तींपैकी एक व्यक्ती दलित तर दुसरी व्यक्ती इतर समाजातील असावी. तसेच यासाठी तुम्हाला काही अटी पाळाव्या लागतील.
तुम्हाला हिंदू विवाह कायदा 1995 अंतर्गत तुमच्या विवाहाची नोंदणी करावी लागेल. यासाठी प्रतिज्ञापत्र भरावे लागेल, त्यानंतर तुमचे लग्न नोंदणीकृत होईल. या योजनेंतर्गत त्या नवविवाहित जोडप्यांनाच लाभ मिळतो, जे त्यांचे पहिले लग्न करत आहेत. नवविवाहित जोडपे आपल्या मतदारसंघातील विद्यमान खासदार किंवा आमदारांच्या शिफारशीने अर्ज पूर्ण करू शकतात आणि ते थेट डॉ. आंबेडकर फाउंडेशनकडे पाठवू शकतात.
जोडपे अर्ज पूर्णपणे भरून राज्य सरकार किंवा जिल्हा प्रशासनाकडे सादर करू शकतात. यानंतर, राज्य सरकार किंवा जिल्हा प्रशासन डॉ. आंबेडकर फाउंडेशनच्या शिफारशीसह अर्ज सादर करेल. त्यानंतर योजनेसाठी तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला मदत मिळेल.
जोडप्यांपैकी जो कोणी दलित म्हणजेच अनुसूचित जाती समाजातील असेल, त्याचे जात प्रमाणपत्र अर्जासोबत जोडावे लागेल. तसेच असा कागदपत्रही अर्जासोबत जोडावा लागेल, ज्यावरून हे सिद्ध होईल की दोघांचे हे पहिले लग्न आहे.
नवविवाहित पती-पत्नीचे उत्पन्नाचे प्रमाणपत्रही जोडावे लागेल. जोडप्याच्या संयुक्त बँक खात्याचा तपशील द्यावा लागेल. यानंतर नवविवाहित जोडप्याचा अर्ज योग्य आढळल्यास त्यांच्या संयुक्त खात्यावर तात्काळ दीड लाख रुपये पाठवले जातात. याशिवाय उर्वरित एक लाख रुपये त्यांना फिक्स्ड डिपॉझिट म्हणून देण्यात येतील.
from https://ift.tt/dK4gvHf