मुंबई : राष्ट्रवादीला एकाच दिवसात दोन जबर झटके बसले आहेत. परभणीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी यांनी पदाचा राजीनामा दिल्याची माहिती आहे.
बाबाजानी दुर्राणी यांच्या राजीनाम्यामुळे पक्षाला मोठा धक्का बसला आहे. नुकतेच राष्ट्रवादीचे रायगड जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार सुरेश लाड यांनी राजीनामा दिला होता.
परभणी जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची चांगली ताकद आहे. असे असताना गेल्या काही महिन्यांपासून पक्षातील गटबाजी मोठ्या प्रमाणात उफाळून आली होती.सहा महिन्यांपूर्वी झालेल्या परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत ही गटबाजी प्रकर्षाने समोर आल्याचे पाहायला मिळाले.
या निवडणुकीत काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुरेश वरपूडकर यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीतील घटक पक्षांतील सदस्यांचे पॅनल उभे करण्यात आले होते. याविरोधात भाजपचे माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांचे पॅनल होते.

जिल्हा बँकेवर गेल्या काही वर्षांपासून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश वरपूडकर यांचं वर्चस्व आहे. परंतु दुर्राणी यांचा बँकेच्या जिल्हाध्यक्षपदावर डोळा होता. त्यामुळे त्यांनी भाजपाच्या पॅनलमध्ये जाणे पसंत केले. याच पॅनलमधून ते व त्यांच्या समर्थकांनी निवडणूक लढवली. या निवडणुकीत वरपूडकर यांच्या पॅनलने एकतर्फी विजय मिळवला आहे.
आमदार दुर्राणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदावर होते. मात्र, पाथरी येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटी थकबाकीदार असल्याच्या कारणावरून त्यांचे जिल्हा बँकेचे संचालक पद रद्द करण्याबाबत आदेश मागील सरकारने काढले होते.

हे संचालक पद कायम ठेवण्याचे आदेश या सरकारने काही दिवसांपूर्वीच काढले होते. त्यांच्यावर कोणताही संबंध नसताना चुकीचं कारण दाखवून संचालकपद रद्द केल्याचा आरोप झाला होता.
दरम्यान, आमदार सुरेश लाड यांनी प्रकृतीचे कारणामुळे राजीनामा देत असल्याचं त्यांनी सांगितले. कर्जत मतदारसंघात शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे विरुद्ध माजी आमदार सुरेश लाड असा संघर्ष अनेकदा पाहायला मिळाला आहे.
याच संघर्षामुळे कर्जत मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचं समीकरण जुळताना दिसत नाही. एकीकडे लाड यांचा थोरवे यांच्याविरुद्ध संघर्ष पाहायला मिळालेला आहे तर दुसरीकडे सिडको महामंडळाच्या अध्यक्षपदासाठी त्यांचे नाव चर्चेत होते.

from https://ift.tt/30XaGsL

By News

Leave a Reply

Your email address will not be published.