राळेगणसिद्धी : राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राळेगणसिद्धीला येथे येत जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. या भेटीत राज्यपाल घटनात्मक पदावर असतानाही हजारे यांच्यासमोर नतमस्तक होत त्यांना नमस्कार केला. त्यांच्या या विनम्रतेमुळे सध्या ते राळेगणसिद्धी व परिसरातील सर्वांचेच कौतुकाचे विषय ठरले आहेत. त्यांचा हा साधेपणा तसेच त्यांनी अण्णांविषयी दाखविलेला भाव गावकऱ्यांना विशेष भावाला. त्यांच्या भेटीनंतर सर्वचजण त्यांचे कौतुक करत होते.
दरम्यान कोश्यारी यांनी संपूर्ण दौऱ्यात हजारे यांचा हात पकडत येथे झालेल्या विकासकामांची व माहिती केंद्राची पाहणी करत असलेले फोटो सोशल माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेले पहावयास मिळाले. यावेळी संपूर्ण दौऱ्यात त्यांनी अत्यंत कमी वेळात येथील सामाजिक कामांचा आढावा घेतला. त्यांना पाहण्यासाठी परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती.
राज्यपाल कोश्यारी यांनीही सर्वांना हात दाखवत नागरिकांना अभिवादन केले. यावेळी राळेगणसिद्धी येथील ग्रामस्थांनी राज्यपालांना अण्णांनी लिहिलेली पुस्तके भेट दिली.
सरपंच धनंजय पोटे, लाभेष औटी, जयसिंग मापारी, सुरेश पठारे, दादा पठारे,संजय पठाडे, वैशाली भगत, संदिप पठारे, शाम पठाडे, शेख अन्सार, रामदास सातकर, नाना आवारी, प्रशांत मापारी, कांतीलाल मापारी, प्रविण फटांगडे, रुपेश फटांगडे, दत्ता आवारी, गणेश भापकर, एकनाथ भालेकर, भाऊसाहेब पोटघन, कविता गडकर आदींसह ग्रामस्थांनी प्रशासनाला सहकार्य करत हा दौरा यशस्वी करण्यासाठी मोलाचे प्रयत्न केले.
 
‘सादगी से बढकर कोई शृंगार नही होता, और विनम्रता से बढकर कोई व्यवहार नही होता, ग्रेट भेट, विनम्रता, साधेपणा, मोठी माणसं ही लहानपनापासूनच मोठी होत असतात’ यासारख्या विविध प्रतिक्रिया सोशल माध्यमांवर उमटल्या. तर अनेक जणांच्या फेसबुक व व्हाटसअपच्या स्टेट्सला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे हजारे यांच्या चरणी नतमस्तक होताना व हातात हात घेतलेले फोटो पाहावयास मिळाले.

from Parner Darshan https://ift.tt/3bmsDCE

By News

Leave a Reply

Your email address will not be published.