अहमदनगर : राज्यात सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना पक्षाचे दोन मंत्री आपल्या पत्नीचा छळ करत आहेत. त्यांनी माझ्याशी संपर्क केला असून त्या दोघी माझ्या शिवशक्ती सेना पक्षात प्रवेश करण्यास तयार असून पुढील काही दिवसांमध्ये नगर शहरात या मंत्री पत्नीचा प्रवेश होणार असल्याची माहिती शिवशक्ती सेना पक्षाच्या प्रमुख करूणा धनंजय मुंडे यांनी दिली.
करूणा धनंजय मुंडे दोन दिवशीय अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर आहेत. सोमवारी त्यांनी नगर शहरात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी शिवशक्ती सेना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष भाऊसाहेब शिंदे, सचिव रवी गवळी, मुरलीधर दातरक आदी उपस्थित होते.
करूणा मुंडे म्हणाल्या, शक्ती कायदा झाला तरी महाराष्ट्रात महिला सुरक्षित नाही. मी गेल्या महिन्याभरात अहमदनगर जिल्ह्यासह नाशिक, पुणे, औरंगाबाद जिल्ह्यात दौरा केला त्यावेळी अनेक पक्षाचे पुरुष, महिलांच्या भेटी झाल्या. त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाला ते वैतागले असून माझ्यासोबत काम करण्याचे त्यांनी मान्य केले आहे. येत्या काही दिवसांत विविध पक्षाचे अनेक पदाधिकारी प्रवेश करणार आहेत.
राज्यात महिला सुरक्षित नाहीत. ३२ हजार महिला गायब असून या सरकारकडून वेगळ्या पद्धतीने व घराणेशाहीचे राजकारण सुरू आहे. माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना पुढे करून त्यांच्या सोबत लढणार असल्याचे करूणा मुंडे यांनी सांगितले. संचारबंदी लागू असून ती उठल्यानंतर मी अहमदनगरमध्ये शक्ती प्रदर्शन करणार असून महाराष्ट्रभर जनजागृती अभियान राबविणार आहे.
मी माझा पक्ष काढून राज्यभर जात असल्याने माझे पती धनंजय मुंडे मला घरात बसण्यासाठी माझ्यावर दबाव आणत आहे. मात्र मी हाती घेतलेला लढा सुरूच ठेवणार आहे.
करूणा मुंडे

from https://ift.tt/3qWbTdT

By News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *