
पारनेर : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अंतर्गत झालेल्या पारनेर तालुका युवक काँग्रेसच्या निवडणुकीत तालुकाध्यक्षपदी योगेश भाऊसाहेब शिंदे हे विजयी झाले असून मतदान पद्धतीने झालेल्या निवडणुकीत त्यांना एकूण 1हजार 19 मते मिळाली आहेत.
योगेश शिंदे यांनी दोन वर्षे पारनेर तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष पदाची धुरा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात साहेब,महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे सांभाळली आहे.पारनेर तालुक्यात पक्ष संघटना वाढीसाठी श्री.शिंदे यांचे मोठे योगदान आहे.
देशाचे नेते राहुल गांधी यांच्या संकल्पनेनुसार युवकांच्या संघटनेसाठी लोकशाही पध्दतीने युवक काँग्रेसची पक्षांतर्गत निवडणूक ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली होती. या निवडणूकीचा निकाल नुकताच जाहीर झाला असून पारनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी योगेश शिंदे विजयी झाले असून त्यांना 1 हजार 19 मते मिळाली.आगामी काळात युवकांचे मोठे संघटन करून पक्षबांधणीसाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगत आपल्या विजयासाठी मदत करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांना श्री. शिंदे यांनी धन्यवाद दिले आहेत.
from https://ift.tt/T680gIG