राजगुरूनगर : खेड तालुक्यातील पश्चिम भागातील येळवली गावच्या परिसरात रान गव्याचे दर्शन गावकऱ्यांना झाले आहे. या भागात गवताळ कुरणे व निमसदाहरित जंगलाने व्यापलेला आहे. या परिसरात सांबर, भेकर, डुक्कर, साळिंदर, ससा, बिबट्या, तरस आदी प्राणी आढळतात. परंतु, प्रथमच या भागात रानगव्याचे दर्शन घडले असल्याचे गावकरी सांगत आहे.
येळवली गावचे सुभाष डोळस, मंगेश सोनवणे व धोंडू बाणेरे यांनी प्रत्यक्ष रानगवा पाहिला असून त्यांनी या बाबत भीमाशंकर अभयारण्यातील वनपरिक्षेत्र अधिकारी वसंत चव्हाण व वनपाल भीमाशंकर वनरक्षक एन. एच. गिऱ्हे, एस. एस. ससाणे, वनरक्षक गुलाब गोरे यांना दिली. गवा दिसल्याने भीमाशंकर अभयारण्यात नव्याने वन्यजीवाची नोंद झाली आहे.

हा रानगवा माळशेज घाटातून भीमाशंकर अभयारण्यात आलेला आहे. हा गवा एकटाच असून तो कळप सोडून वाट चुकलेला आहे. स्थानिकांनी गवा दिसल्यास त्याला डिवचू नये. नागरिकांनी समूहाने कामासाठी बाहेर पडावे.
आतापर्यंत या गव्याकडून कुठल्याही प्रकारचा उपद्रव झालेला नसून त्याला पाहण्यासाठी एकट्याने जाऊ नहे.तो रस्ता भरकटत आला असून तो परत त्याच्या कळपात जाईन असे वनपरिक्षेत्र अधिकारी वसंत चव्हाण यांनी सांगितले.

from https://ift.tt/3nOVG8E

By News

Leave a Reply

Your email address will not be published.