
सर्वसाधारणपणे घर बांधायचं म्हटलं की सिमेंट, वीट, माती यासारख्या गोष्टी डोळ्यासमोर येतात. मात्र चीनमधील एक इमारत पूर्णपणे (पाया सोडून) लाकडांचा वापर करून बनवण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे या 24 मजली इमारतीची उंची 99.9 मीटर एवढी आहे.
या इमारतीमध्ये एकूण 150 खोल्या आहेत. या इमारतीला मजबूत बनवण्यासाठी देवदारच्या लाकडांचा वापर केला गेलाय. या इमारतीच्या भितींपासून ते छतापर्यंत सर्वच गोष्टी या लाकडापासून बनवण्यात आल्या आहेत.
चीनच्या गुइझोई प्रांतातील यिंगशान शहरातील ही इमारत सध्या रिकामी असली तरी पर्यंटकांना बघण्यासाठी ती उघडण्यात आली आहे. या इमारतीला बघण्यासाठी लांबून-लांबून पर्यटक येतात. या इमारतीची निर्मिती आर्किटेक्ट सुइ हँगने केले असून ही इमारत बनवण्यासाठी दोन वर्ष लागले. हँगने सांगितले की, या इमारतीचे डिझाईन तीन वर्षांपूर्वीच बनवण्यात आले होते.
from https://ift.tt/3rm8BzZ