
जगात काही देशांच्या सीमा अशाही आहेत ज्या ठिकाणी तणाव, काटेरी तारा, सैनिक असे काहीच नाही. या सीमा सर्वसामान्य नागरिक सहज पार करू शकतात. हे ठिकाण नेदरलँड येथील.
नेदरलँडच्या लिमबर्ग प्रांतात असे एक ठिकाण आहे. ज्याठिकाणी नेदरलँड, बेल्जियम आणि जर्मनी या तीन देशांच्या सीमा एकत्र येतात. अगदी छोटासा कसबा असलेले हे ठिकाण अतिशय लोकप्रिय पर्यटन स्थळ परिचित आहे.
समुद्रसपाटीपासून जवळपास 10 हजार फुट उंचीवर असलेल्या या ठिकाणचे नाव वाल्स असे आहे. हे नेदरलँडमधील हे सर्वात उंचीवरचे स्थळ असल्याचे बोलले जाते. अनेक पर्यटक आणि या ठिकाणाला आवर्जून भेट देतात. या ठिकाणी मधोमध एक दगड आहे.
त्याच्या एका बाजूवर N, दुसरीकडे B आणि तिसरीकडे G अशी इंग्रजी अक्षरे आहेत. या ठिकाणी एक पाउल जरी तुम्ही पुढे टाकले तर दुसऱ्या देशाच्या हद्दीत जाता येते. विशेष म्हणजे यासाठी पासपोर्ट, व्हिसाची गरज नसते. थोडक्यात सांगायचे तर या तिन्ही देशांच्या सीमा म्हणजे फक्त रेषा आहेत. कुठला देश कुठल्या बाजूचा? हे समजण्यासाठी विविध अक्षरे दगडावर लिहिली गेली आहेत.
from https://ift.tt/3JBuhQM