
700 वर्षांपूर्वीचे तंत्रज्ञान वापरून पारंपरिक पद्धतीने तयार करण्यात आलेलं दोन मजली मातीचं घर तुम्ही कधी पाहिलंय का? नसेल तर पुण्यातील एका वास्तुविशारदचे घर नक्की पहा.
पुण्याच्या युगा आखरे आणि सागर शिरुडे या जोडप्याने जुन्या तंत्रज्ञानाचा वापर करून दोन मजली मातीचे घर लोणावळ्याजवळील वाघेश्वर गावात बांधले आहे. ते देखील अवघ्या 4 लाखांच्या खर्चात.
हे घर युवा आणि सागरने स्वत:च्या हाताने बनविले आहे. बांबु आणि मातीचा वापर करून तयार केलेल्या या घरात बाटल्या आणि डब्यांचा वापर केला आहे. यामुळे घरातील तापमान संतुलित ठेवले जाणार आहे.
गुळ, गवत, गोमुत्र, शेण, कडुनिंब यांचा वापर मातीचा गारा तयार करण्यासाठी केला. या मातीने सगळ्या भिंती लिंपण्यात आल्या आहेत. या घराची कल्पना सुचली तेव्हा हे घर पावसाळ्यात टिकणार नाही असे सांगितले जात होते. मात्र युगा आणि सागर यांनी घरबांधणीच्या तंत्राचा अभ्यास करून हे घर उभे केले आहे.
from https://ift.tt/3xDjm3y