‘या’ जिल्ह्यांत पावसाची शक्यता; यलो अलर्ट जारी !

Table of Contents

शिरूर : हवामान खात्याच्या वतीने अहमदनगरसह पुणे, नाशिक, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, उस्मानाबाद आणि लातूर अशा अकरा जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

गेल्या आठवडाभरापासून राज्यात अनेक ठिकाणांना जोरदार पावसानं झोडपून काढलं आहे. कालही पुण्यासह घाट परिसरात आणि ग्रामीण भागात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळला आहे.ऐन हिवाळ्याच्या दिवसांत अचानक पाऊस पडल्यानं घराबाहेर पडलेल्या नागरिकांची पुरती धांदल उडाली आहे.
पुढील आणखी दोन दिवस राज्यात पावसाची स्थिती कायम राहणार आहे. येत्या दोन दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र, आणि घाट परिसरात अनेक ठिकाणी पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे.गेल्या आठवडाभरापासून राज्यात अनेक ठिकाणांना जोरदार पावसानं झोडपून काढलं आहे.

संबंधित जिल्ह्यात आज दिवसभर ऊन गायब असल्याने वातावरणात गारवा होता. त्यामुळे पुढील तीन ते चार तासांत संबंधित जिल्ह्यात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार ते अतीमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, काल रात्री झालेल्या अवकाळी मुसळधार पावसामुळे पारनेर – श्रीगोंदे सीमेलगत गव्हाणवाडी देवदैठण परिसरातील वीटभट्टी मालकांचे मोठे नुकसान झाले. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या शेतीमालाला ही मोठा फटका बसला. हातातोंडाशी आलेल्या भाजीपाला आणि कांदा पिकाचे सर्वात जास्त नुकसान झाले.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोसळणाऱ्या या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांना मोठ्या प्रमाणावर धोका निर्माण होतं आहे. ऐन हिवाळ्याच्या दिवसांत ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोग पडण्याचा धोका देखील निर्माण झाला आहे.

from https://ift.tt/32tAVHN

Leave a Comment

error: Content is protected !!