
आज आम्ही तुम्हाला जगातील सर्वात लांब नाव असलेल्या ठिकाणाबद्दल माहिती देणार आहोत. या ठिकाणाचं नाव एवढं मोठं आहे की, ते वाचून तुमची बोबडी वळेल, हे नक्की. हे ठिकाण त्याच्या नावामुळेचं जगभर प्रसिद्ध झालंय.
न्यूझीलंडच्या उत्तर बेटावर ‘टॉमेटा’ नावाची टेकडी आहे. हे या टेकडीचे छोटे नाव आहे. खरं नाव वाचून तुम्हाला गरगरल्यासारखं वाटेल. ‘Taumatawhakatangihangakoauauotamateaturipukakapikimaungahoronukupokaiwhenuakitanatahu’असं ते नाव आहे.
हे नाव स्थानिक भाषा माओरीमध्ये लिहिलेले आहे. त्याचा अर्थ आहे असा की, ‘ज्या शिखरावर एक गिर्यारोहक, एक जमीन गिळणारा आणि टमाटी नावाचा माणूस मोठ्या गुडघ्यांसह प्रियजनांसाठी बासरी वाजवत होता’. या संपूर्ण नावात एकूण 85 अक्षरे आहेत. या नावाचे स्पेलिंग बरोबर आहे की नाही? हे पाहण्यात अनेकांचा अर्धा दिवस जात असेल. मात्र येथील लोकांना या नावाचा अभिमान वाटतो.
स्थानिक लोक या जागेला टॉमेटा किंवा टॉमेटा हिल म्हणून ओळखतात. या टेकडीची उंची 305 मीटर आहे. या टेकडीचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जगातील सर्वात लांब नाव असलेले ठिकाण म्हणून नोंद आहे.
from https://ift.tt/32HG1Rc