साडेतीन मुहूर्तापैकी एक म्हणजे गुढीपाडवा. या दिवशी नूतन संवत्सराची सुरुवात होते, म्हणून चैत्र शुद्ध प्रतिपदेचा दिवस शुभ मानला जातो. या दिवशी गुढी उभारुन नव्या संकल्पाचा शुभारंभ केला जातो. चैत्र महिन्याचा पहिला दिवस म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा होय. हाच वर्षांरंभाचासुद्धा दिवस असल्यामुळे खगोलीय गणितानुसारदेखील याला विशेष महत्त्व आहे. यंदा गुढीपाडव्याचा सण शनिवारी 2 एप्रिलला आहे. यंदा मुहूर्त काय? जाणून घेऊयात…
गुढीपाडव्याचा मुहूर्त काय? :
● फाल्गुन अमावस्या 1 एप्रिल 2022 रोजी सकाळी 11 वाजून 53 मिनिटांनी संपेल.
● अमवस्या संपल्यानंतर प्रतिपदा तिथीला सुरुवात होईल.
● दुसऱ्या दिवशी 2 एप्रिल 2022 च्या रात्री 11 वाजून 58 मिनिटांपर्यंत राहील.
● तिथीनुसार हा उत्सव 2 तारखेला साजरा केला जाईल.
● या दिवशी अमृत सिद्धी योग आणि सर्वार्थ सिद्धी योग तयार होत आहे.
● ज्योतिषशास्त्रानुसार, हे दोन्ही योग अत्यंत शुभ आणि फलदायी मानले जातात.
गुढी कशी उभाराल? जाणून घ्या :
● गुढी उभी करण्यासाठी आवश्यक काठी स्वच्छ धुऊन, पुसून घ्या.
● त्याला रेशमी वस्त्र बांधून त्यावर एखादे चांदीचे भांडे किंवा घरातील कोणतेही स्वच्छ भांडे ठेवा.
● गुढीला कडुनिंबाची पाने, आंब्याच्या डहाळ्या बांधाव्यात, साखरेची माळ घाला.
● जिथे गुढी उभी करावयाची आहे ती जागा स्वच्छ करून रांगोळी काढा.
● अंघोळ करून त्या जागी गुढी बांधा व हळद, कुंकू, फुले वाहून तिची पूजा करा.
● ब्रह्मदेवाने या सृष्टीला चालना दिलेली असल्याने या गुढीलाच ब्रह्मध्वज असेही म्हटले जाते. या ब्रह्मध्वजाची पुढील मंत्राने प्रार्थना करावी. ब्रह्मध्वज नमस्तेरस्तु सर्वाभिष्ट फलप्रद।

प्राप्तेरस्मिन्वत्सरे नित्यं मदगृहे मंगल कुरु ।।
● प्रार्थना झाल्यावर पंचांगाचे पूजन करून नवीन वर्षांचे पहिल्या दिवसाचे पंचांग वाचा.
● त्यानंतर कडुनिंब, गूळ, जिरे आदी घालून केलेले कडुनिंबाचे पाणी घ्या.
● त्यानंतर वर्षभरातील महत्त्वाच्या घटना पीक-पाणी यांची माहिती करून घ्या.
● सकाळी लवकर गुढी उभी करून सूर्यास्ताच्या सुमारास नमस्कार करून ती पुन्हा उतरवून ठेवावी.

from https://ift.tt/qJA8mnH

By News

Leave a Reply

Your email address will not be published.