…म्हणून ही महिला दररोज तिच्या लग्नाचा पोशाख घालते!

Table of Contents

शीर्षक वाचून वाटले असेल, नक्की हा प्रकार आहे तरी काय? चला तर जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. तर हि महिला आहे दक्षिण ऑस्ट्रेलियाच्या अ‍ॅडलेड शहरात राहणारी टॅमी हॉल. ती पर्यावरणवादी महिला असून ती फिशिंगला जाताना, फुटबॉल किंवा जिम खेळताना, जवळपास सर्वच कामे करताना ती लग्नाचा ड्रेस परिधान करते.
दररोज लग्नाचा ड्रेस परिधान करण्यामागचे कारण सांगताना टॅमी म्हणाली की याचा संबंध भारताशी आहे. 2016 मध्ये ती भारत फिरायला गेली असता नवीन कपडे आणि शूजवर किती खर्च करावा लागतो? हे तिला कळले. पुढे भारतातून परत आल्यानंतर तिने विचार केला की आता ती व्यर्थ खर्च करणार नाही.
तिचे लग्न ऑक्टोबर 2018 मध्ये निश्चित झाले होते. लग्नाच्या वेळी, टॅमीला लेसी पांढऱ्या पोशाखसाठी 985 पौंड (सुमारे 86 हजार भारतीय) खर्च करावे लागले. एका वृत्तानुसार, टॅमीने सांगितले की, फक्त एका ड्रेससाठी इतका खर्च करणे योग्य नाही. म्हणून, या ड्रेसचे पूर्ण पैसे वसुल करायचे. या हेतूने तिने दररोजच्या कपड्यांप्रमाणे तो दररोज घालायचा निर्णय घेतला आहे.
पुढे टॅमी म्हणाली, ‘जेव्हा मी दररोज हा ड्रेस घालते तेव्हा लोक मला पाहतात. ते असा विचार करत असतील की या या ड्रेसशिवाय, दुसरा कोणता ड्रेस आहे कि नाही? हिच्याकडे. परंतु मला दररोज माझा लग्नाचा पोशाख घालायला आवडतो. आता तर सार्वजनिक वाहतुकीत आणि प्रत्येक कामासाठी लग्नाचा ड्रेस परिधान करते, असे तिने सांगितले.

from https://ift.tt/3IsXrjG

Leave a Comment

error: Content is protected !!