मृत्यू हे जीवांचे अंतिम सत्य आहे. मात्र स्मशानभूमीत अंत्य संस्कार करुन आलेल्या व्यक्तीच्या अंगावर गंगाजल शिंपडले जाते किंवा त्या व्यक्तीला आंघोळ करावी लागते. यामागचे नेमके कारण काय? याबाबत आज जाणून घेऊयात…  
यामागचे धार्मिक कारण म्हणजे स्मशान एक अशी जागा आहे, ‘जेथे नकारात्मक शक्तींचा सहवास असतो’. या शक्ती कमकुवत व्यक्तीवर ताबा मिळवतात. असे देखील म्हटले जाते की, अंत्ययात्रा संपल्यानंतर आत्मा काही काळ तेथेच असतो, जो कुणावरही प्रभाव टाकण्याची शक्ती ठेवतो.
यामागचे वैज्ञानिक कारण म्हणजे अंतिम संस्कार करण्यापूर्वी मृतदेह हा बराचकाळ बाहेर असतो. त्यामुळे वातावरणात सुक्ष्म आणि संक्रामक किटाणूंचा संसर्ग वाढतो. दरम्यान मृत व्यक्तीचे शरीर संसर्गित रोगापासून ग्रासले जाते. त्यामुळे अशा ठिकाणी उपस्थित असलेल्या लोकांवरही त्याचा परिणाम होऊ शकतो. मात्र, आंघोळ केल्यानंतर किटाणू साफ होतात. म्हणून खऱ्या अर्थाने अंत्यसंस्कार केल्यानंतर आंघोळ करण्याची प्रथा आपल्याकडे आहे.

from https://ift.tt/3FkhleD

By News

Leave a Reply

Your email address will not be published.