कोरोना आला आणि सगळ्यांच्या जगण्याची समीकरणं बदलली… गेल्या दोन वर्षणापासून कोरोनासोबत जगत असताना आपण काही सवयी आपल्या अंगवळणी पडल्या आहेत. जसे की, स्वच्छतेची काळजी किंवा मास्क लावणं. 
कोरोना विषाणूपासून सुरक्षित राहण्यासाठी मास्क गरजेचं आहे. मात्र मास्कमुळं चष्म्यावर येणारी वाफ अनेकदा अडचणीची ठरते. श्वासोच्छवास घेताना चष्म्यावर वाफेचा थर जमतो आणि धुसर दिसायला लागतं. या समस्येपासून तुमची सुटका होण्यासाठी खालील गोष्टी तुमची मदत करतील…
वाफ कशी जमते? : श्वसनक्रिया सुरु असताना मास्कच्या वापराने श्वासातून वाफ बाहेर फेकली जाते. जी मास्कच्या वरच्या भागातून निसटते आणि चष्म्यापर्यंत येऊन पोहोचते.
मग काय करावं? जाणून घ्या!
● मास्क स्कीन फ्रेंडली टेपच्या सहाय्यानं चेहऱ्यावर आतल्या बाजून चिकटवा.
● मास्क लावण्याआधी चष्म्याच्या काचा स्वच्छ धुवा. यासाठी लिक्वीड किंवा साबणाच्या पाण्याचा वापर करा.
● चष्मा नीट अ‍ॅडजस्ट केल्यास, नोजपॅड काहीशी वर ठेवल्यास चष्मा हा चेहऱ्यापासून दूर राहील आणि सहाजिकच त्यावर मास्क लावलेला असतानाही वाफ जमणार नाही.

from https://ift.tt/3nDLkZ5

By News

Leave a Reply

Your email address will not be published.